Crime News: बंगळुरूमध्ये एक शहरात धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका तरुणाने अचानक पीजीमध्ये प्रवेश केला, नंतर एका मुलीच्या खोलीत घुसून त्याने खोलीच्या दाराला आतून कुलूप लावलं. मग त्या तरुणाने मुलीसोबत मन हेलावून टाकणारं कृत्य केलं. नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT
पीडिता झोपली असताना खोलीत घुसला
संबंधित प्रकरण बंगळुरूमधील असल्याची माहिती आहे. त्या रात्री सुमारे 3 वाजता, एक मास्क घातलेला तरुण अचानक पीजीमध्ये घुसला. त्यानंतर, तो अतिशय सावधपणे एका तरुणीच्या खोलीकडे जात असल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसलं. त्यावेळी पीडित तरुणी खोलीत झोपली होती. आरोपी तरुण खोलीमध्ये घुसल्यानंतर रूममेट आली असावी, असं पीडितेला वाटलं आणि त्याकडे काहीच लक्ष न देता ती झोपून गेली. मात्र, त्या अनोळखी तरुणाने हळूच खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि त्याला कुलूप लावलं.
हे ही वाचा: घटस्फोटित बायकांना पती आणायचा घरी, खोलीत शारीरिक संबंध अन् पत्नी बनवायची व्हिडीओ... नवरा बायकोचा 'हा' विचित्र खेळ
पीडितेचे हात-पाय बांधले अन्...
यानंतर, आरोपी तरुणाने पीडिताला घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्याने तरुणीचे हात आणि पाय बांधले. त्यावेळी पीडितेने देखील धाडस दाखवलं आणि ओरडून आरोपीला लाथ मारली. पण, पीडित तरुणाने विरोध करून देखील आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि तिला मारहाण सुद्धा केली. इतकेच नव्हे, तर आरोपी तरुणाने पीडितेच्या तिजोरीमधील 2500 रुपये चोरले आणि तिथून पळून गेला.
हे ही वाचा: मनोज जरांगेंच्या मनात एकनाथ शिंदेंनी फसवल्याची भावना आता का आली?
आरोपीविरुद्ध FIR दाखल
सकाळ होताच तरुणीने सुड्डागुंटेपल्या पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेच FIR दाखल केला आणि सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, आरोपी तरुणाविरुद्ध अद्याप कोणताच पुरावा हाती लागला नसल्याची माहिती आहे.
काही दिवसांपूर्वी याच परिसरात अशीच एक घटना घडली होती. एका तरुणाने मध्यरात्री पीडितेचं लैंगिक शोषण केलं आणि त्यानंतर तो फरार झाला. आता या पीजीमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
ADVERTISEMENT
