पती-पत्नी बाजारात गेले होते..घरी परतल्यावर सर्वांशी गप्पाही मारल्या, पण काही तासानंतर रुममध्ये आढळला दोघांचा मृतदेह!

Husband And Wife Shocking Death :  उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या जिल्ह्यातील मछरिया परिसरात एका नवविवाहित जोडप्याचा मृतदेह संशयास्पदरित्या त्यांच्या घरात आढळला.

 जोडप्याचा मृतदेह घरातील नर्सिंग अधीक्षक कंत्राटी कर्मचारी

Couple Suicide Case

मुंबई तक

• 08:47 PM • 04 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

त्या दाम्पत्याने बाजारातून घरी आल्यावर घेतला गळफास

point

पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु

point

त्या गावात नेमकं काय घडलं?

Husband And Wife Shocking Death :  उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या जिल्ह्यातील मछरिया परिसरात एका नवविवाहित जोडप्याचा मृतदेह संशयास्पदरित्या त्यांच्या घरात आढळला. दोघांनीही रुममध्ये गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपायुक्त ( दक्षिण विभाग) योगेश कुमार यांनी म्हटलंय की, ऑटो चालक मोहम्मद साजिद (22) आणि त्याची पत्नी शाहिदा (20) यांनी राहत्या घरी रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांच्या लग्नाला दोन महिने झाले होते. 

हे वाचलं का?

योगेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, साजिद आणि शाहिदा मंगळवारी दुपारी बाजारात गेले होते. ते घरी परतल्यानंतर खुश असल्यासारखं वागत होते. दोघांनीही त्यांच्या कुटुंबियांसोबत गप्पाही मारल्या होत्या. कुटुंबियांच्या माहितीनुसार, काही तासांनंतर दरवाजा नॉक केला, पण तो दरवाजा उघडला नाही. त्यानंतर उघडकीस आलं की, दोघांनी गळफास घेतला आहे. त्यानंतर कुटुंबियांनी तातडीनं या घटनेबाबत पोलिसांना सांगितलं.

हे ही वाचा >> पतीने पत्नीला समोसा आणला नाही..बायकोनं माहेरच्या लोकांना बोलावून पतीला धू-धू-धुतलं! प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं अन्..

बाजारातून घरी आल्यावर दाम्पत्याने टोकाचं पाऊल का उचललं? 

पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसच कुमार यांनी पुढं म्हटलं की, घरात कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट नव्हती. दाम्पत्याने टोकाचं पाऊल का उचलंल, याचा तपास केला जात आहे. कुटुंबातील सदस्य आणि शेजाऱ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. कुटुंबियांनी म्हटलंय की, दोन महिन्यांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. त्यानंतर सर्वकाही ठीक होतं.

दोघेही आनंदात राहत होते. बाजारातही गेले होते. त्यानंतर घरी परतल्यावरही ते खूश होते. दोघेही त्यांच्या रुममध्ये गेले, पण चहा पिण्यासाठी बाहेर आले नाहीत. आम्ही आवाज दिला, त्यानंतरही काही हालचाली दिसल्या नाहीत. त्यानंतर पाहिलं तर दोघेही गळफास घेऊन लटकले होते. कुटुंबियांसह गावकऱ्यांना या घटनेबाबत मोठा धक्का बसला आहे. दोघांनीही लव्ह मॅरेज केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. त्यानंतरच त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल.   

हे ही वाचा >> GF सोबत शारीरिक संबंध केले..प्रेग्नंट झाल्यावर मित्राने गर्भपाताच्या गोळ्या पाठवल्या, तरुणी BF विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गेली अन्..

    follow whatsapp