6 महिन्यांच्या गर्भवती महिलेची गळा दाबून हत्या, प्रियकराच्या आवळल्या मुसक्या

सुशांत काळे

• 01:56 PM • 24 Nov 2026

Crime News : गर्भवती प्रेयसीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. केसरपुरा गावाच्या हद्दीत 19 नोव्हेंबर 2026 रोजी 19 वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला तरुणीच्या शरीरावर कोणत्याही बाह्य जखमांच्या खुणा दिसून आल्या नव्हत्या, त्यामुळे तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नव्हते.

crime news

crime news

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सहा महिन्यांची गर्भवती महिलेचा गळा दाबून मृत्यू

point

प्रेमसंबंधातून शारीरिक संबंध ठेवले

Crime News : गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात गर्भवती प्रेयसीची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. केसरपुरा गावाच्या हद्दीत 19 नोव्हेंबर 2026 रोजी 19 वर्षीय सपनाचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला तरुणीच्या शरीरावर कोणत्याही बाह्य जखमांच्या खुणा दिसून आल्या नव्हत्या, त्यामुळे तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नव्हते.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : 'या' राशींना आर्थिक लाभ, जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

सहा महिन्यांची गर्भवती महिलेचा गळा दाबून मृत्यू

पोलिसांनी सुरुवातीला हडाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. मात्र, शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे आणि तिचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे उघड झाले.

वैद्यकीय तपासणीत समोर आलेल्या या धक्कादायक माहितीमुळे पोलीसही चक्रावून गेले, कारण या घटनेत एका गर्भवती महिलेसह तिच्या पोटातील बाळाचाही जीव गेला होता. यानंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हत्या आणि गर्भस्थ शिशुच्या मृत्यूशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला. हडाद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103(1) आणि 92 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलिसांसमोर सुरुवातीला कोणताही प्रत्यक्ष पुरावा नव्हता, परंतु तपासादरम्यान गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाची मदत घेण्यात आली. पोलिसांनी कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) सह इतर तांत्रिक बाजूंची तपासणी केली, ज्यातून प्रेमसंबंधांचा एक संशयास्पद धागा समोर आला. या आधारे पोलिसांनी केसरपुरा गावातील 20 वर्षीय विजय सोलंकी याला संशयाच्या भोवऱ्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता प्रकरणाचे धागेदोरे उलगडू लागले.

हे ही वाचा : पुणे : 'तो' संशय व्यक्त केल्यानं कोमलची हत्या, सॉफ्टवेअर इंजिनिअरने क्रूरतेचा कळस गाठला

प्रेमसंबंधातून शारीरिक संबंध ठेवले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना आणि विजय सोलंकी यांचे प्रेमसंबंध होते आणि त्यांच्यात शारीरिक संबंध ठेवले होते. यातूनच सपना गर्भवती राहिली होती. या गर्भधारणेवरून दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.याच वादातून रागाच्या भरात विजयने सपनाचा गळा दाबला, ज्यात तिचा मृत्यू झाला, असा आरोप आहे. पोलिसांनी आरोपी विजय सोलंकीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.