Crime News: गुजरातच्या सूरतमधून एक हृदयद्रावक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथे एका आईने आपल्या 2 वर्षांच्या मुलाला 13 व्या मजल्यावरून फेकलं आणि नंतर स्वत:सुद्धा उडी मारून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना 3 सप्टेंबर (बुधवारी) रोजी घडल्याची माहिती आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. सध्या, पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. मृत महिलेचं नाव पूजा असल्याची पोलिसांनी माहिती दिली.
ADVERTISEMENT
गणपती मंडपाच्या 20 मीटर अंतरावर...
पोलिसांच्या तपासात, परिसरातील गणपती मंडपाच्या अवघ्या 20 मीटर अंतरावर ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. तरीसुद्धा, बराच काळ या प्रकरणाबद्दल कोणालाच काहीही कळालं नाही. सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला आई आणि मुलाचे मृतदेह जमिनीवर पडल्याचे आढळले आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. हे प्रकरण सूरतमधील अलथाण परिसरातील असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: जावयाने विधवा सासूला हॉटेलमध्ये नेलं अन् केलं घृणास्पद कृत्य! नंतर अश्लील व्हिडीओ सुद्धा...
सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
एका सीसीटीव्ही फुटेजमुळे ही घटना समोर आली. एक महिला लिफ्टमधून आपल्या मुलाला घेऊन वरच्या मजल्यावर जाते आणि तिथून तिने मुलाला फेकून दिल्याचं फुटेजमध्ये दिसत आहे. मुलगा खाली पडत असल्याचं देखील या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. तसेच, मुलगा खाली पडल्यानंतर काही सेकंदातच आरोपी महिलेने देखील उडी मारून आत्महत्या केली. एकमेकांपासून काही मीटर अंतरावरच दोघांचे मृतदेह आढळले. त्यानंतर, स्थानिकांनीच या घटनेची पोलिसांना माहिती दिली.
हे ही वाचा: Personal Finance: UPI मध्ये होणार मोठा बदल, 15 सप्टेंबरपासून 'हा' नियम होणार लागू!
घटनेमागचं नेमकं कारण काय?
पोलिसांच्या प्राथमिक तपासात या घटनेमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. महिलेच्या कुटुंबियांकडून सुद्धा तिच्या आत्महत्येचं खरं कारण स्पष्ट झालं नाही. आर्थिकदृष्ट्या सुद्धा महिलेच्या कुटुंबाची परिस्थिती चांगली होती. अखरे, महिलेने आधी तिच्या मुलाला इमारतीवरून खाली का फेकलं आणि नंतर स्वतः उडी मारून आत्महत्या का केली? याचा तपास पोलीसांकडून सुरू आहे. मृत महिलेचा फोन सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याचा तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
