Personal Finance: UPI मध्ये होणार मोठा बदल, 15 सप्टेंबरपासून 'हा' नियम होणार लागू!
UPI Rule Change 15 Sept 2025: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने 15 सप्टेंबर 2025 पासून कर भरणा आणि काही श्रेणीतील व्यापाऱ्यांसाठी UPI व्यवहारांची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT

personal finance, upi, upi money, upi payment, upi rules change, upi rules change september 15, money
Personal Finance Tips for UPI Payment: जर तुम्ही युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने 15 सप्टेंबरपासून काही कॅटेगरीसाठी UPI व्यवहार मर्यादा वाढवली आहे. आता काही पेमेंटमध्ये तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त पैसे पाठवू शकाल.
कोणत्या कॅटेगरीमध्ये वाढवली मर्यादा?
भांडवली बाजार, विमा, सरकारी ई-मार्केटप्लेस, प्रवास, क्रेडिट कार्ड बिल पेमेंट, व्यवसाय/व्यापारी पेमेंट, कलेक्श - या सर्वांसाठी मर्यादा 5 लाख रुपये करण्यात आली आहे.
दागिने खरेदी आणि डिजिटल खाते उघडणे (प्रारंभिक निधी) - या सर्वांसाठी मर्यादा 2 लाख रुपये असेल.
टर्म डिपॉझिट डिजिटल अकाउंट उघडणे आणि एफएक्स रिटेल (BBPS प्लॅटफॉर्म) - या कॅटेगरीमध्ये देखील 5 लाख मर्यादा रुपये असेल.
