Jalgaon Suicide Case, मनीष जोग : अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून पती-पत्नीने आपल्या दोन लहान मुलांसह धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत झाल्याने टाकरखेडा गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पुणे : श्रावणात मटणाचा हट्ट, बापाने लेकाला गळा दाबून संपवलं; आईने काय केलं बघाच...
पहाटेच्या सुमारास घराबाहेर पडले, चौघांचा भयंकर शेवट
टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल आणि त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल हे आपल्या दोन मुलांसह पहाटेच्या सुमारास घराबाहेर पडले. पहाटे सुमारे चार वाजता ते घरातून बाहेर पडले होते. त्यांच्यासोबत दुसरी इयत्तेत शिकणारा सनी आणि अंगणवाडीत जाणारा राज हे दोन लहान मुलं होते. चौघेही घराबाहेर पडल्यानंतर रेल्वे मार्गाच्या दिशेने गेले.
हेही वाचा : 'एक कोटी खोका मतदाराला धोका..' ठाकरेंचे नगरसेवक फोडताच पोस्टर्स..
दोन्ही मुलांसह दाम्पत्याने रेल्वेखाली झोकून दिल्याची माहिती
त्यानंतर सुनील भिल, त्यांची पत्नी पार्वती आणि त्यांची दोन्ही लहान मुलं सनी व राज यांनी धावत्या रेल्वेखाली झोकून दिल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत चौघांचाही जागीच मृत्यू झाला. पहाटे सुमारे ४ वाजून ४० मिनिटांनी रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने टाकरखेडा गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. कौटुंबिक वादातून हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, या घटनेमुळे एका कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी अंत झाला आहे. पहाटेच्या वेळी घडलेल्या या घटनेने टाकरखेडा परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT












