Nagpur Crime : नागपुरातील जरीपटका परिसरात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीशी संबंधित गंभीर प्रकरण समोर आले आहे. 24 वर्षीय तरुणाने Instagramच्या माध्यमातून मुलीशी अश्लील चॅट केल्याचा प्रकार समोर आलाय. तसेच व्हिडिओ कॉलचे कथित रेकॉर्डिंग सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत मुलीवर लग्नासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर जरीपटका पोलिसांनी POCSO कायदा आणि IT कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 24 वर्षीय आरोपीला अटक केली असून, सध्या तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'एक कोटी खोका मतदाराला धोका..' ठाकरेंचे नगरसेवक फोडताच पोस्टर्स..
संभाषणादरम्यान मुलीशी अश्लील चॅट केल्याचा आरोप
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित मुलगी सहावीत शिकते. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, मुलीला तिच्या एका मैत्रिणीमार्फत Instagramवरील एक ID मिळाली होती. त्यानंतर ती आरोपीच्या संपर्कात आली. Instagramवर झालेल्या संभाषणादरम्यान मुलीशी अश्लील चॅट केल्याचा आरोप आहे. याच संभाषणादरम्यान धर्म परिवर्तन आणि लग्नासाठी मुलीवर दबाव आणल्याचाही तक्रारीत आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा : PM पदासाठी नरेंद्र मोदी एक नंबर, दुसरी पसंती राहुल गांधी अन् तिसऱ्या नंबरवर कोण?
मुलीच्या आईला या संभाषणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मुलीचे Instagram अकाउंट तपासले. त्यावेळी कथित अश्लील चॅट आणि व्हिडिओ कॉलशी संबंधित रेकॉर्डिंग समोर आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच व्हिडिओ कॉलचे कथित रेकॉर्डिंग Instagramवर अपलोड करण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या आईने जरीपटका पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तक्रार मिळाल्यानंतर जरीपटका पोलिसांनी POCSO कायद्यासह IT कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चंद्रपूर निवासी 24 वर्षीय आरोपी अंकित संपत देवगडे याला अटक केली आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीची चौकशी केली जात असून, त्याच्या सोशल मीडिया अकाउंटसह चॅट, व्हिडिओ आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. याबाबत जरीपटका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी प्रमोद चौधरी यांनी माहिती दिली.
ADVERTISEMENT












