PM पदासाठी नरेंद्र मोदी एक नंबर, दुसरी पसंती राहुल गांधी अन् तिसऱ्या नंबरवर कोण?

मुंबई तक

Mood Of The Nation : इंडिया टुडे आणि सी-व्होटर यांच्या ताज्या 'मूड ऑफ द नेशन' सर्वेक्षणानुसार, पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी 49% पाठिंब्यासह अव्वल पसंतीचे उमेदवार आहेत, तर राहुल गांधी यांना 27 टक्के पाठिंबा देण्यात आलाय, तर पंतप्रधान पदासाठी तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे याची माहिती पुढे दिलीये.

ADVERTISEMENT

Mood Of The Nation
Mood Of The Nation
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पंतप्रधान म्हणून मोदींना पहिली पसंती

point

राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून दुसऱ्या क्रमांकाची पसंती

point

तर तिसऱ्या क्रमांकावर.. ? 

Mood Of THe Nation : इंडिया टुडे आणि सी-व्होटर यांच्या ताज्या 'मूड ऑफ द नेशन' सर्वेक्षणानुसार, पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी 49% पाठिंब्यासह अव्वल पसंतीचे उमेदवार आहेत, तर राहुल गांधी यांना 27 टक्के पाठिंबा देण्यात आलाय, तर 9 टक्के मतांसह तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांचा क्रमांक आहे, असे मूड ऑफ नेशनच्या सर्वेक्षणातून समोर आलेले आहे, याची एकूण माहिती पुढीलप्रमाणे.. 

हे ही वाचा : Gen Z चा सरकारी नोकरी परीक्षांच्या निष्पक्षतेबाबत मूड काय?

पंतप्रधान म्हणून मोदींना पहिली पसंती

सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेची सर्वोच्च पसंती ठरलेली आहे. अशातच राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान म्हणून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अशातच अलिकडेच सर्वेक्षणातून राहुल गांधी यांच्या लोकप्रियेत सातत्याने वाढ झाल्याचं दिसून येतंय. तसेच पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची आवड अधिक आहे. 

राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून दुसऱ्या क्रमांकाची पसंती, तर तिसऱ्या क्रमांकावर.. ? 

अशातच सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची राष्ट्रीय राजकारणावरील पकड आता आणखी मजबूत होऊ लागली आहे. दरम्यान, आता राहुल गांधी यांनी विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून आपले काम सुरू ठेवले आहे. अशातच पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांना पसंती देण्यात आलीये. 

हे ही वाचा : Personal Finance: बाजार कोसळला म्हणून SIP थांबवणार? जरा थांबा अन्...

सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, 49 टक्के नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी पसंती देण्यात आली आहे. याचा अर्थ जवळपास निम्म्या प्रसिसादकांनी मोदींना पसंदी दिली आहे, तर 27 टक्के राहुल गांधी यांना पंतप्रधान पदासाठी पसंती दिली आहे. राहुल गांधी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तामिळनाडूचे सी.जोसेफ यांना पंतप्रधान पदासाठी 9 टक्के लोकांनी पसंदी दिली आहे. यावरून असे स्पष्ट होते की, नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यानंतर विजय यांना देखील राष्ट्रीय पातळीवर लोक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.