Gen Z चा सरकारी नोकरी परीक्षांच्या निष्पक्षतेबाबत मूड काय?

मुंबई तक

Mood Of Nation Gen Z : इंडिया टुडे आणि सी-व्होटरच्या मूड ऑफ नेशनच्या सर्वेत तरुणांनी आपली बाजू मांडली आहे. यावरून हे स्पष्ट होते की, मोठ्या संख्येने तरुण परीक्षांच्या निष्पक्षतेबद्दल पूर्णपणे समाधानी नाहीत. 

ADVERTISEMENT

Mood Of Nation Gen Z
Mood Of Nation Gen Z
Google CTA

बातम्या हायलाइट

point

'या' तरुणांचा सरकारी नोकरी परीक्षांच्या निष्पक्षतेवर अजिबात विश्वास

point

'या' तरुणांचा परीक्षांच्या निष्पक्षतेवर प्रचंड विश्वास

point

'या' तरुणांना रोजगाराबाबत चिंता

Mood Of Nation Gen Z : सरकारी नोकरी आज देखील देशातील तरुणांसाठी करियरच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. अधिककरून Gen Z च्या समोर रोजगाराची निर्मिती ही बाब मोठी चिंता बनली आहे. अशातच सरकारी नोकऱ्यांसाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांबाबतच्या निष्पक्षतेच्या विश्वासावर तरुणांनी मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. इंडिया टुडे आणि सी-व्होटरच्या मूड ऑफ नेशनच्या सर्वेत तरुणांनी आपली बाजू मांडली आहे. यावरून हे स्पष्ट होते की, मोठ्या संख्येने तरुण परीक्षांच्या निष्पक्षतेबद्दल पूर्णपणे समाधानी नाहीत. 

हे ही वाचा : कौटिल्य ॲकॅडमीची डील, तरुणीच्या बॉयफ्रेंडसह बापही अटकेत, MPSC पेपरफुटीची Inside Story

'या' तरुणांचा सरकारी नोकरी परीक्षांच्या निष्पक्षतेवर अजिबात विश्वास

सर्वेक्षणानुसार, 40 टक्के तरुणांनी सरकारी नोकरी परीक्षांच्या निष्पक्षतेवर अजिबात विश्वास नसल्याचे सांगितले, तर 27 टक्के तरुणांना कमी विश्वास असल्याचे सांगितले. याचा अर्थ असाय की, 67 टक्के लोकांना स्पर्धा परीक्षांच्या निष्पक्षतेवर कमी आणि अजिबातच विश्वास राहिलेला नाही. ही आकडेवारी तरुणांमधील वाढत्या चिंतेवर प्रकाश टाकते. या प्रकरणात मोठ्या संख्येनं तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे तयारी करतात परीक्षांसाठी कठोर परिश्रम आणि पैसा या दोन्हींची आवश्यकता असते. त्यामुळे, परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यास आत्मविश्वास डळमळण्याची शक्यता आहे. 

'या' तरुणांचा परीक्षांच्या निष्पक्षतेवर प्रचंड विश्वास

सर्वेक्षणात 14 टक्के प्रतिसादकांनी भरती परीक्षांच्या निष्पक्षतेवर प्रचंड विश्वास व्यक्त केला, तर 9 टक्के मध्यम स्वरुपाचा विश्वास असल्याचे सांगितले. याचा अर्थ असाय की, केवळ 23 टक्के प्रतिसादकांना भरती परीक्षा प्रक्रियेवर पूर्ण किंवा खूप अधिकचा विश्वास आहे.  तर 10 टक्के तरुणांना यावर आपले मत मांडले नाही. आकडेवारीवरून हे स्पष्टपणे दिसून येतेय की, आत्मविश्वास असलेल्यांहून व्यक्त होणाऱ्यांच्या संख्येत अधिकची वाढ आहे.  

'या' तरुणांना रोजगाराबाबत चिंता

दरम्यान, Gen Z पिढीतील तरुणांनी 53 टक्के रोजगाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. केवळ 4 टक्के तरुणांनी मानसिक आरोग्याला सर्वात मोठी गंभीर समस्या असल्याचे मानले आहे. यावरून असून सूचित केले गेलेय की, तरुण सध्या रोजगार आणि करिअर संबंधित समस्यांना प्राधान्य देत आहे.