कौटिल्य ॲकॅडमीची डील, तरुणीच्या बॉयफ्रेंडसह बापही अटकेत, MPSC पेपरफुटीची Inside Story

मुंबई तक

MPSC drug inspector recruitment paper leak : औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याची तक्रार 23 मार्चला झाली, मात्र 155 दिवसांनी मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात पेपरफुटी उघडकीस आली. ऋतुजा आणि गौरव यांच्या प्रेमप्रकरणातील वादातून प्रकरण समोर आले असून, एमपीएससीने भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

MPSC drug inspector recruitment paper leak
MPSC drug inspector recruitment paper leak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

कौटिल्य ॲकॅडमीची डील

point

तरुणीच्या बॉयफ्रेंडसह बापही अटकेत

point

MPSC पेपरफुटीची Inside Story

MPSC drug inspector recruitment paper leak : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागातील औषध निरीक्षक (गट-ब) पदाच्या भरती परीक्षेचा पेपर फुटल्याची पहिली तक्रार 23 मार्च रोजी एफडीएकडे करण्यात आली होती. मात्र, या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर 21 जुलै रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) ई-मेलद्वारे पेपरफुटीची तक्रार करण्यात आली. त्यावेळीही पेपर फुटल्याचा आरोप नाकारण्यात आला. मात्र, मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात तब्बल 155 दिवसांनी पेपरफुटी झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी एमपीएससीचा अवर सचिव अभिजित लेंडवे, दोन सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीचा संचालक प्रवीण पाटील, पेपर खरेदी करणाऱ्या विद्यार्थिनी ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील आणि तक्रारदार गौरव पाटील यांचाही अटकेतील आरोपींमध्ये समावेश आहे.

हेही वाचा : मॉडेलवर घरात घुसून चाकूने सपासप वार, जीम ट्रेनरने कशामुळे केली हत्या?

10 प्रश्न चुकीचे सोडवण्यास सांगितले, ऋतुजाने गौरवला पाठवली पीडिएफ 

या पेपरफुटीचे प्रकरण ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्या प्रेमप्रकरणातील वादातून समोर आल्याची माहिती आहे. 20 मार्च रोजी ऋतुजाला एका अॅपवर प्रश्नपत्रिका पाठवण्यात आली होती. तिने ती डाउनलोड न करता बॅकअप म्हणून तिचा बॉयफ्रेंड गौरवला फॉरवर्ड केली. ऋतुजाने ‘इम्पॉर्टंट’ असे लिहून 25 पानांच्या पीडीएफचे स्क्रीनशॉट गौरवला पाठवले होते. 20 मार्च रोजी रात्री 10.55 ते 11.48 या वेळेत झालेल्या संवादात ऋतुजाने हा प्रश्नपत्रिकेचा संच आपल्याला दिल्याचे सांगितले. त्यातून मुद्दाम 10 प्रश्न चुकीचे सोडवायला सांगितल्याचेही तिने नमूद केले होते. याच संवादात तिने कौटिल्यकडून दुसऱ्या दिवशी 5 लाख रुपये मागितले जात असल्याचे सांगितले. तिचे वडील पैसे कुठून आणायचे, यामुळे टेन्शनमध्ये असल्याचेही तिने गौरवला सांगितले.

हेही वाचा : नंदुरबारमध्ये सुरू झालेली प्रेम कहाणी FDA च्या पेपर फुटीपर्यंत कशी गेली?