नंदुरबारमध्ये सुरू झालेली प्रेम कहाणी FDA च्या पेपर फुटीपर्यंत कशी गेली?

मुंबई तक

MPSC Paper leak : ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्या प्रेमप्रकरणातील वादातून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटीचा प्रकार समोर आल्याची माहिती आहे. या प्रकरणानंतर MPSC ने भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

MPSC Paper leak
MPSC Paper leak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

आधी ब्रेकअप, तिचं दुसऱ्यासोबत लग्न आणि MPSC पेपर फुटला..

point

नंदुरबारमध्ये सुरू झालेली प्रेम कहाणी FDA च्या पेपर फुटीपर्यंत कशी गेली?

point

A to Z स्टोरी मुंबई Tak वर

MPSC Paper leak : नंदुरबारमध्ये एकाच कॉलनीत राहणाऱ्या ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्यात स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासादरम्यान ओळख झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. गौरवने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास गांभीर्याने घेणे सोडले, तर ऋतुजाला फार्मास्युटिकल कंपनीत नोकरी मिळाली. मात्र, सरकारी अधिकारी होण्याचे तिच्या वडिलांचे आणि तिचे स्वप्न कायम राहिले. त्यासाठी एका क्लासेसशी संबंधित व्यक्तीच्या माध्यमातून परीक्षा पास होण्यासाठी सेटिंग लावण्यात आल्याची माहिती आहे. 22 मार्च 2026 रोजी होणाऱ्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेपूर्वी पेपर मिळवण्यासाठी पाच लाख रुपये अॅडव्हान्स देण्यात आल्याचे सांगण्यात आले. ऋतुजाला प्रश्नपत्रिका मिळणार असल्याचे आधीच सांगण्यात आले होते.

हेही वाचा : प्रेमसंबंधाच्या वादातून महसूल सहाय्यक असलेल्या तरुणीवर कोयत्याचे 8 वार, 2 महिन्यांनी मृत्यू

दोघांचे ब्रेकअप झाले अन् पुढे काय घडलं? 

20 मार्च रोजी ऋतुजाला एका अॅपवर प्रश्नपत्रिका पाठवण्यात आली. ती डाउनलोड न करता तिने बॅकअप म्हणून प्रश्नपत्रिका तिच्या बॉयफ्रेंडला म्हणजे गौरवला फॉरवर्ड केली. 22 मार्च रोजी परीक्षा झाल्यानंतर दुपारी 12 वाजून 28 मिनिटांनी ऋतुजाने पेपर देणाऱ्या व्यक्तीशी फोनवर संपर्क साधला. परीक्षेत 100 पैकी 90 प्रश्न पर्यायांसह तंतोतंत आले असून त्यापैकी 78 प्रश्न आपण सोडवल्याचे तिने सांगितल्याची माहिती आहे. उर्वरित प्रश्न तिने अंदाजाने सोडवल्याचेही सांगण्यात आले. मात्र, यानंतर ऋतुजा आणि गौरव यांच्यात वाद सुरू झाले. पुढे दोघांचे ब्रेकअप झाले. ऋतुजा अधिकारी होणार असल्याने घरच्यांकडून लग्नासाठी वेगळी स्थळे पाहिली जातील, अशी चर्चा त्यांच्यात होत असल्यानेही दोघांमध्ये मतभेद वाढल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा : NEET विद्यार्थिनीने संपवलं जीवन, लहान बहिणीने दरवाजा उघडताच बसला धक्का