बाप आणि लेकीच्या नात्याला काळिमा! दिड वर्षापासून नराधमाने लेकीवर केले अत्याचार

मुंबई तक

Crime News : बाप आणि लेकीच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आईचा मृत्यू झाल्यानंतर हैवान झालेल्या बापाने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना आहे.

ADVERTISEMENT

crime news (AI Photo)
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

बापाची लेकीवर जबरदस्ती

point

आरोपी नराधम बापाला पोलिसांकडून अटक 

Crime News : बिहारच्या मुजफ्फरपुर येथून बाप आणि लेकीच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आईचा मृत्यू झाल्यानंतर हैवान झालेल्या बापाने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना आहे. आरोपी नराधम बाप हा दीड वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होता, या घटनेनं परिसर हादरून गेला होता. हा घटनेला संतापून पीडितेनं नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली होती. मात्र, आरोपी ऐकायला तयार नव्हता. 

हे ही वाचा :  जालन्यात झोका खेळताना पाचवीच्या मुलाला लागला फास, हृदयद्रावक घटनेत मृत्यू

आरोपी नराधम बापाला पोलिसांकडून अटक 

संबंधित प्रकरणात पीडितेनं वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलीने केलेल्या तक्रारीनुसार आरोपीला पोलिसांनी अटक केली. पीडितेनं पोलिसांना या घटनेची माहिती दिली, नंतर पुढे ती म्हणाली, 2019 मध्ये आईचं निधन झालं होतं. तसेच तिला दोन भाऊ देखील आहेत. दिड वर्षे तिच्या वडिलांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केला, याचदरम्यान विरोध केल्यास तिला बेदम मारहाण करायचा, नंतर जीवे मारण्याची धमकी दिली होती. 

17 ऑगस्ट रोजी पीडितेनं मोठ्या आईला आणि मोठ्या बाबांना आपल्याच बापाने केलेल्या या गैरकृत्याची माहिती दिली. मोठी आई आणि मोठ्या बाबांनी पीडितेच्या वडिलांना या प्रकरणाबाबत विचारले होते. या प्रकरणी आरोपी तलवार घेऊन आला आणि आपल्या मोठ्या भावाला आणि वहिणीला धमकी देत तिथून पळवून लावले. 

हे ही वाचा : नवऱ्यासह सासूने सुनेला टॉयलेट क्लीनर पाजलं, उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

आपल्याच मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न

दरम्यान, शुक्रवारी आरोपीने पुन्हा आपल्याच मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न देखील केला. मुलीने हिंमत दाखल पोलिसांना घटनेची माहिती दिली. 112 नंबर फोन करत पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संबंधित प्रकरणात आरोपीला घरातून अटक करण्यात आले.