पुणे : श्रावणात मटणाचा हट्ट, बापाने लेकाला गळा दाबून संपवलं; आईने काय केलं बघाच...
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. श्रावणात मटणाच्या जेवणाची मागणी केल्याने वडिलांनी मुलाची हत्या केली. याप्रकरणी आई-वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे : श्रावणात मटणाचा हट्ट
बापाने लेकाला गळा दाबून संपवलं
आईने काय केलं बघाच...
Pune Crime News : पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. श्रावण महिन्यात दारू पिऊन घरी येत मटणाच्या जेवणाची मागणी मुलाने केली. यावरून झालेल्या वादानंतर वडिलांनीच पोटच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रामनगर येथे घडलेल्या या प्रकरणात महेश भागवत गायकवाड (30) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी मृत तरुणाचे वडील भागवत सूर्यभान गायकवाड (64) आणि आई पार्वती भागवत गायकवाड (60) या दोघांना अटक केली आहे.
10 वर्षांपूर्वी मोडला संसार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महेश हा बेरोजगार होता आणि त्याला दारूचे व्यसन होते. दारूच्या याच व्यसनामुळे 10 वर्षांपूर्वी त्याचा संसार मोडला होता आणि पत्नी दोन्ही मुलांना घेऊन निघून गेल्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला होता. महेश एकटाच राहत होता. तो दररोज जेवणासाठी शेजारीच राहणाऱ्या आई-वडिलांकडे जात असे. दारू पिणे, कामावर न जाणे आणि नियमित भांडणे करणे यावरून महेशचे वडिलांसोबत सतत वाद होत असत.
हे ही वाचा : CJP राजकारणात आल्यास किती टक्के Gen-Z तरुणाई थेट पाठिंबा देणार?
श्रावणात मटणाची मागणी
श्रावण महिना सुरू असल्याने आई-वडिलांनी मटणाचे जेवण बनवण्यास नकार दिला होता. यावरून महेशने घरात मोठा वाद घातला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात वडिलांनी महेशला बेदम मारहाण करत त्याचा गळा दाबून खून केला. मुलगा दगावल्याचे समजल्यानंतरही आई-वडिलांनी ही बाब लपवून ठेवत नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा : मुंबईत येणार? जरांगेंनी दोनवेळा सज्ज राहण्यास का सांगितलं?
मोठ्या भावाला संशय
दरम्यान, महेशच्या गळ्याभोवती संशयास्पद व्रण आणि चेहऱ्यावर जखमा दिसल्याने त्याचा मोठा भाऊ गणेश गायकवाड याला संशय आला. त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता, महेशचा मृत्यू डोक्यावरील जखमांमुळे व श्वास गुदमरून झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यानंतर गणेश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी महेशच्या आई-वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ ताब्यात घेतले.
