CJP राजकारणात आल्यास किती टक्के Gen-Z तरुणाई थेट पाठिंबा देणार?
gen z cjp mood of the nation survey : NEET पेपरफुटीविरोधातील Gen Z आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या CJPच्या राजकीय भवितव्याबाबत MOTN Survey मधून महत्त्वाचे संकेत समोर आले आहेत. CJP निवडणूक लढवल्यास 33 टक्के लोक मतदान करण्यास तयार, तर 43 टक्के लोकांनी मतदान करणार नसल्याचे सांगितले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
CJP राजकारणात आल्यास किती टक्के Gen-Z तरुणाई थेट पाठिंबा देणार?
Abhijeet Dipke CJP राजकारणात आल्यास किती Gen Z तरुणांचा थेट पाठिंबा?
gen z cjp mood of the nation survey : दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या Gen Z विद्यार्थी आंदोलनामुळे Cockroach Janta Party (CJP) चर्चेत आली. आंदोलनातून निर्माण झालेली लोकप्रियता आता राजकीय पक्षाच्या रूपात मतांमध्ये कितपत रूपांतरित होऊ शकते, याबाबत Mood of the Nation (MOTN) Survey मधून महत्त्वाचे संकेत समोर आले आहेत. सर्वेक्षणानुसार, CJP ने आज राजकीय पक्ष म्हणून निवडणूक लढवली तर 43 टक्के लोकांनी आपण CJPला मतदान करणार नसल्याचे सांगितले आहे. तर 33 टक्के लोकांनी CJPला मतदान करण्याची तयारी दर्शवली असून, 24 टक्के मतदारांनी अद्याप आपली भूमिका निश्चित नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आंदोलनातून मिळालेली लोकप्रियता आणि प्रत्यक्ष निवडणुकीतील मतांचा कल यामध्ये अंतर असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.
हेही वाचा : 76 वर्षीय महिलेची बलात्कार करुन हत्या, त्याआधी तीन वर्षीय चिमुकलीवर...
रोजगार हा भारतासमोरील सर्वात मोठा प्रश्न असल्याचे 53 टक्के तरुणांचे मत
इंडिया टुडे ग्रुप आणि C-Voter यांच्याकडून वर्षातून दोनदा Mood of the Nation Survey केला जातो. ऑगस्ट आणि जानेवारी महिन्यात हा सर्वेक्षण केला जातो. यावर्षी देशभरातून जवळपास 91 हजार नागरिकांचे सॅम्पल घेण्यात आले. या सर्वेक्षणात तरुणांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. Gen Z संदर्भातील प्रश्नांमध्ये नोकऱ्या आणि रोजगार हा भारतासमोरील सर्वात मोठा प्रश्न असल्याचे 53 टक्के तरुणांनी सांगितले. त्यानंतर शिक्षण आणि परीक्षांशी संबंधित मुद्द्याला 22 टक्के तरुणांनी महत्त्व दिले. महागाई आणि Cost of Living हा मुद्दा 12 टक्के तरुणांनी महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
हेही वाचा : अंबरनाथ : कारमधून उपचारासाठी नेताना अल्पवयीन भाचीवर अत्याचार, मामाला अटक
