अंबरनाथ : कारमधून उपचारासाठी नेताना अल्पवयीन भाचीवर अत्याचार, मामाला अटक

मिथिलेश गुप्ता

अंबरनाथमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका मानलेल्या मामाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Ambernath Crime
Ambernath Crime
Google CTA

बातम्या हायलाइट

point

कारमधून उपचारासाठी नेताना अल्पवयीन भाचीवर अत्याचार

point

त्यानंतरही सोडला नाही पाठलाग

point

मानलेल्या मामाला अटक

Ambernath Crime : अंबरनाथ शहरात एका अल्पवयीन मुलीवर तिच्या आईच्या मानलेल्या भावानेच अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. दातांच्या उपचारासाठी मुंबईला घेऊन जात असताना चालत्या कारमध्ये आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विश्वासाचा गैरफायदा घेत नातेवाईकानेच केलेल्या या कृत्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

कारमधील अत्याचारानंतरही...

कारमधील अत्याचारानंतरही आरोपीने पीडित मुलीचा पाठलाग थांबवला नव्हता. मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिच्यावर पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या वेळी मुलीने प्रसंगावधान राखून मोठ्याने आरडाओरड करत मदतीसाठी धाव घेतली. तिचा आवाज ऐकताच शेजाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला रंगेहाथ पकडले आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

हे ही वाचा : Gen Z चा सरकारी नोकरी परीक्षांच्या निष्पक्षतेबाबत मूड काय?

दोन दिवसांची पोलीस कोठडी

या घटनेप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलमांसह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो - POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे ही वाचा : 'अदाणी-अंबानीच्या हातात गणपती देऊन, आम्ही गरबा बघायचा का?', मनसे नेते लालबाग आणि चिंतामणी मंडळावर संतापले!

आरोपीविरोधात कडक पावले

या प्रकरणाचा पुढील तपास अंबरनाथ पोलीस करत असून, पीडित अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून कायदेशीर आणि आवश्यक ती सर्व कार्यवाही केली जात आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरोधात कडक पावले उचलली जात आहेत.