76 वर्षीय महिलेची बलात्कार करुन हत्या, त्याआधी तीन वर्षीय चिमुकलीवर...
राजकोटमधील एका व्यक्तीने 76 वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केली. ही घटना घडण्याच्या काही महिन्यांपूर्वीच या आरोपीला एका गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते. तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
76 वर्षीय महिलेची बलात्कार करुन हत्या
त्याआधी तीन वर्षीय चिमुकलीवर...
Crime News : एका आरोपीला 3 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात अपील केले. यामध्ये या आरोपीची काही महिन्यांपूर्वीच उच्च न्यायालयाकडून निर्दोष सुटका करण्यात आली. यानंतर आरोपीला आता पुन्हा एका धक्कादायक गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. रमेश वधुकिया असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर 76 वर्षांच्या वृद्ध महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार आणि हत्या केल्याचा गंभीर आरोप आहे. गुजरातच्या राजकोटमधील ही घटना आहे. 21 ऑगस्ट रोजी राजकोट-भावनगर महामार्गावरील आजी डॅमच्या किनाऱ्यावर या वृद्धेचा मृतदेह आढळून आला होता. प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटू शकली नव्हती, परंतु न्यायवैद्यक शवविच्छेदन आणि वृत्तपत्रांतील जाहिरातींनंतर मृत महिला मंदिराबाहेर भीक मागून उदरनिर्वाह करणारी असल्याचे समोर आले.
100 हून अधिक सीसीटीव्ही तपासले, काय दिसलं?
वृद्धेच्या नातवाने दिलेल्या माहितीनुसार, तो 19 ऑगस्टच्या सकाळी तिला राजकोट-अहमदाबाद महामार्गावरील मंदिरापाशी सोडून गेला होता, मात्र संध्याकाळी ती तेथे आढळली नाही. शोध घेऊनही ती न सापडल्याने 20 ऑगस्ट रोजी ती हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर मंदिरापासून मृतदेह सापडलेल्या ठिकाणापर्यंतच्या 13 किलोमीटरच्या परिसरातील सुमारे 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. या फुटेजमध्ये रमेश वधुकिया आपल्या रिक्षातून वृद्धेला घरी पोहोचवण्याच्या बहाण्याने घेऊन जाताना दिसला. त्याने तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन लाकडी दांडक्याने मारहाण केली, बेशुद्धावस्थेत तिच्यावर अत्याचार केले आणि पुन्हा प्राणघातक हल्ला करून तिची हत्या केली.
हे ही वाचा : PM पदासाठी नरेंद्र मोदी एक नंबर, दुसरी पसंती राहुल गांधी अन् तिसऱ्या नंबरवर कोण?
आरोपीचा गुन्हेगारी इतिहास
हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह कपड्यात गुंडाळून आजी डॅमजवळ फेकून दिला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी रिक्षाचालक रमेशला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, प्राथमिक चौकशीतच त्याने अपहरण, बलात्कार, हत्या आणि मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक हरेश पटेल यांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी रमेशचा गुन्हेगारी इतिहास अत्यंत धक्कादायक असून यापूर्वीही त्याच्यावर तीन हत्येचे गुन्हे दाखल आहेत. 2010 मध्ये चोटिला पोलीस ठाण्यात त्याच्यावर लाकडी क्लब आणि दगडाने मारहाण करून हत्या केल्याचा गुन्हा नोंदवला गेला होता.
हे ही वाचा : "मी पुण्याच्या नारायण पेठेतील बापट बोलतोय"
तुरुंगातून सुटल्यानंतर अमानुष गुन्हा
यानंतर 2018 मध्ये त्याने 3 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार आणि तिची हत्या केली होती, ज्या प्रक्रियेने राजकोट हादरले होते. त्याच वर्षी कुवाडवा रोड पोलीस ठाण्यात 70 वर्षांच्या वृद्धेची लुटमारीदरम्यान हत्या केल्याचा आरोपही त्याच्यावर झाला होता. 2020 मध्ये राजकोट सत्र न्यायालयाने 3 वर्षांच्या मुलीच्या बलात्कार-हत्या प्रकरणात रमेशला फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, फेब्रुवारी 2026 मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने परिस्थितिजन्य पुराव्यांमधील त्रुटी आणि साक्षीदारांच्या अविश्वासार्हतेचे कारण देत त्याला संशयाचा फायदा देऊन निर्दोष सोडले होते. तुरुंगातून सुटून अवघे काही महिने होत नाहीत तोच त्याने पुन्हा अशाच प्रकारचा अमानुष गुन्हा केल्याने संताप व्यक्त होत आहे.
