"मी पुण्याच्या नारायण पेठेतील बापट बोलतोय"
Pune Ganeshotsav dj ban demand : पुणे महापालिकेच्या गणेशोत्सव पूर्वतयारी बैठकीत DJ आणि ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरून वाद झाला. नारायण पेठेतील रहिवासी विद्यानंद बापट यांनी सार्वजनिक गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण आणि वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी घेण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले होते. मुंबई Tak ने त्यांची दुसरी बाजू समोर येण्यासाठी संवाद साधलाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
"मी पुण्याच्या नारायण पेठेतील बापट बोलतोय"
पुणे पालिकेच्या गणेशोत्सव बैठकीत काय झालं?
Pune Ganeshotsav dj ban demand : पुणे महानगरपालिकेच्या गणेशोत्सव पूर्वतयारी बैठकीत DJ आणि कर्णकर्कश साऊंड सिस्टीमच्या वापरावरून वाद निर्माण झाला. नारायण पेठेतील रहिवासी विद्यानंद बापट यांनी पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात DJ वर बंदी घालण्याची मागणी केली. सोलापूरच्या धर्तीवर पुण्यातही वर्षभर किंवा किमान गणेशोत्सवाच्या काळात DJ वर सरसकट बंदी घालावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. बैठकीच्या सुरुवातीला नागरिकांना ध्वनिप्रदूषणासंदर्भातील आक्षेप मांडण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर आपण एकट्याने हात वर करून आपली भूमिका मांडली, असे बापट यांनी सांगितले. सार्वजनिक उत्सव साजरा करताना ध्वनिप्रदूषण आणि वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले.
हेही वाचा : 'अदाणी-अंबानीच्या हातात गणपती देऊन, आम्ही गरबा बघायचा का?', मनसे नेते लालबाग आणि चिंतामणी मंडळावर संतापले!
'धर्मस्वातंत्र्याला आपला विरोध नाही, ध्वनिप्रदूषण आणि वाहतुकीचा अडथळा होऊ नये'
बापट यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी भूमिका मांडल्यानंतर काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गदारोळ सुरू केला. मोठ्या आवाजात बोलणे आणि आक्षेप घेण्याचे प्रकार झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या भोवती सुरक्षा रक्षकांचे कडे केले आणि त्यांना बाहेर नेले. आपण कोणत्याही गणेश मंडळाचे प्रतिनिधी म्हणून नव्हे, तर जागरूक नागरिक म्हणून बैठकीला गेलो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक ठिकाणी साजरा होणाऱ्या उत्सवाचा परिणाम अनेक नागरिकांवर होत असल्याने त्या संदर्भात आपला आक्षेप नोंदवण्यासाठी आपण उपस्थित होतो, असेही त्यांनी सांगितले. या भूमिकेमुळे आपल्यावर हिंदूविरोधी असल्याचे आरोप केले जात असल्याचे सांगत बापट यांनी ते आरोप हास्यास्पद असल्याचे म्हटले. धर्मस्वातंत्र्याला आपला विरोध नसून, सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करताना ध्वनिप्रदूषण आणि वाहतुकीचा अडथळा होऊ नये, एवढीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : कौटिल्य ॲकॅडमीची डील, तरुणीच्या बॉयफ्रेंडसह बापही अटकेत, MPSC पेपरफुटीची Inside Story
