18 वर्षीय सुनिताचा मृतदेह तलावात आढळला, शरीराला बांधले दगड

मुंबई तक

27 Aug 2026 (अपडेटेड: 27 Aug 2026, 04:43 PM)

Crime News : एका महिलेचा मृतदेह हा गावातील एका तलावात आढळून आला होता. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. एवढंच नाही,तर मृत महिलेच्या मृतदेहाला 20 किलोचे दोन मोठे दगड बांधण्यात आले होते. तरुणीच्या वडिलांनी मुलीची हत्या केल्याच्या संशय व्यक्त केला.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सुनीताचा गावाजवळील तलावात पीडितेचा मृतदेह

point

मृतदेहाला 20 किलोचे दोन मोठे दगड बांधले

Crime News : मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेचा मृतदेह हा गावातील एका तलावात आढळून आला होता. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. मृत तरुणीची सुनीता (वय 18) अशी ओळख समोर आली. एवढंच नाही,तर मृत महिलेच्या मृतदेहाला 20 किलोचे दोन मोठे दगड बांधण्यात आले होते. तरुणीच्या वडिलांनी मुलीची हत्या केल्याच्या संशय व्यक्त केला असून मृत्यूबाबत निष्पक्षपणे चौकशीची मागणी केली.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'अदाणी-अंबानीच्या हातात गणपती देऊन, आम्ही गरबा बघायचा का?', मनसे नेते लालबाग आणि चिंतामणी मंडळावर संतापले!

नेमकं काय घडलं? 

मृत तरुणीचे वडील श्यामसिंह बारेला यांनी सांगितलं की, त्यांची मुलगी तब्बल 6 तासांपासून गायब होती. त्यांनी सांगितलं की, घटनेपूर्वी सुरूवातीला सुनीताचा नवरा जबर सिंह बारेला याला फोनद्वारे संपर्क साधण्यात आला होता. अशा स्थितीत जबर सिंहने फोनद्वारे संपर्क करत सांगितलं की, त्यांची मुलगी पळून जात आहे. याबाबतीत सकाळी येऊन बोलले अशी माहिती त्याने दिली. वडिलांच्या म्हणण्यांनुसार, सुमारे अर्ध्या तासानंतर दबार सिंहने पुन्हा फोन करून सुनीता पळून गेल्याची माहिती दिली. 

सुनीताचा गावाजवळील तलावात पीडितेचा मृतदेह

कुटुंब हे सुनीताचा गेली सहा दिवसांपासून शोध सुरू केला होता. सोमवारी सकाळी गावाजवळील एका तलावात पीडितेचा मृतदेह आढळून आला होता, असा कुटुंबियांनी आरोप केला आहे. दरम्यान, सुनीता आणि जबरसिंग बरेला यांचे सुमारे पाच महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर सुनीता ही बेपत्ता झाल्याने आणि तिचा मृतदेह आढळल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला होता. 

हे ही वाचा : अनैतिक संबंधांचा संशय, जिम ट्रेनरचा चिरला गळा, मध्यरात्री काय घडलं?

हरंगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी असलेले अभिषेक सेंगर यांनी सांगितलं की, सुनीताचा मृतदेह हा गावानजीक असलेल्या एका तलावात आढळून आला होता. तिच्या शरीराला दगड बांधलेले आढळून आले होते. तलावातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर तिचे हात आणि पाय दिसू लागल्यावर हे प्रकरण उघडकीस आले होते. मृतदेहाची अवस्था पाहून हे प्रकरण हत्या असल्याचे दिसते. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.