अनैतिक संबंधांचा संशय, जिम ट्रेनरचा चिरला गळा, मध्यरात्री काय घडलं?
एका जिम ट्रेनरची गळा चिरुन हत्या करण्यात आली. मध्यरात्री दोनच्या सुमारास काही जणांनी ट्रेनरला एकटं गाठून संपवलं. काकीनाडामधील ही घटना आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अनैतिक संबंधांचा संशय
जिम ट्रेनरचा चिरला गळा
मध्यरात्री काय घडलं?
Crime News : एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक हत्येची घटना उघडकीस आली आहे. 26 ऑगस्टच्या मध्यरात्री अंदाजे 2 वाजताच्या सुमारास ही रक्तरंजित घटना घडली. येथे एका 30 वर्षीय जिम ट्रेनरची गळा चिरून निघृण हत्या करण्यात आली. पोडामाटी सतीश रेड्डी असे या दुर्दैवी मृत जिम ट्रेनरचे नाव असून, या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील ही घटना आहे.
हल्ला करुन आरोपी फरार
या प्रकरणी पोलीस तपासात बंदुला साई किरण आणि त्याच्या काही साथीदारांची नावे समोर आली आहेत. सतीशवर अचानक हल्ला केल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून तातडीने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच काकीनाडा टू टाऊन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून औपचारिक गुन्हा दाखल केला. सध्या पोलीस या प्रकरणात नेमके किती हल्लेखोर होते आणि त्यांनी कशा प्रकारे ही हत्या घडवून आणली, याचा सखोल तपास करत आहेत.
हे ही वाचा : कौटिल्य ॲकॅडमीची डील, तरुणीच्या बॉयफ्रेंडसह बापही अटकेत, MPSC पेपरफुटीची Inside Story
अनैतिक प्रेमसंबंध की पैशांचा वाद?
या हत्येमागचे नेमके कारण शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. प्राथमिक तपासादरम्यान अनैतिक प्रेमसंबंध आणि पैशांच्या व्यवहारातून हा वाद उद्भवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप प्रेमसंबंधांच्या कोनाबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पोलीस सध्या मृत सतीश आणि संशयित आरोपींमधील जुने संबंध, आर्थिक व्यवहार आणि पूर्ववैमनस्य अशा सर्व शक्यतेच्या बाजूने तपास चक्रे फिरवत आहेत.
हे ही वाचा : Personal Finance: बाजार कोसळला म्हणून SIP थांबवणार? जरा थांबा अन्...
पूर्ववैमनस्यातून आखला कट
सध्या मुख्य संशयित आरोपी बंदुला साई किरण आणि त्याच्या फरार साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. हल्ल्यानंतर आरोपी कोणत्या मार्गाने पळून गेले आणि ते कुठे लपले असण्याची शक्यता आहे, याचा तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे माग काढला जात आहे. प्राथमिक तपासात हा हल्ला दारूच्या नशेत केलेला वाटत नसून, पूर्ववैमनस्यातून आखलेला कट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
