मॉडेलवर घरात घुसून चाकूने सपासप वार, जीम ट्रेनरने कशामुळे केली हत्या?

मुंबई तक

27 Aug 2026 (अपडेटेड: 27 Aug 2026, 09:59 AM)

Muskan Murder Case : पश्चिम दिल्लीतील तिलक नगरमध्ये घरात एकटी असलेल्या मुस्कान या युवतीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणात इमरान नावाच्या जिम ट्रेनरवर संशय असून पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे.

Muskan Murder Case

Muskan Murder Case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मॉडेलवर घरात घुसून चाकूने सपासप वार

point

जीम ट्रेनरने कशामुळे केली हत्या?

Muskan Murder Case : पश्चिम दिल्लीतील तिलक नगर परिसरात घरात एकटी असलेल्या युवतीवर अज्ञात व्यक्तीने चाकूने सपासप वार करून तिची हत्या केली. मुस्कान नावाची ही युवती विद्यार्थीनी असून पार्ट टाइम मॉडेलिंग करत होती. या प्रकरणात इमरान नावाच्या जिम ट्रेनरवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : क्रूर बापाने कौटुंबिक वादातून सहा महिन्यांच्या बाळाला फरशीवर आदळलं

मुस्कान आरोपीला ओळखत असल्याची माहिती समोर

घटनेच्या वेळी मुस्कान घरात एकटी होती. याचाच फायदा घेत आरोपी घरात शिरला आणि तिच्यावर चाकूने अनेक वार केले. गंभीर जखमी झालेल्या मुस्कानला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सुरुवातीच्या तपासात मुस्कान आरोपीला ओळखत असल्याची माहिती समोर येत आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

हेही वाचा : MPSC पेपर लीक : 10 वर्षाची मेहनत, पेपर फुटला, भरती रद्द; विद्यार्थी म्हणतात..

हत्येमागील नेमका हेतू काय? पोलिसांचा तपास सुरु 

मृत मुस्कान तीन बहिणींमध्ये सर्वात लहान होती आणि तिचे लग्न झालेले नव्हते. कुटुंबीयांच्या जवळच्या व्यक्तींनुसार इमरान नावाच्या तरुणाने ही हत्या केल्याचा संशय आहे. मुस्कानचा भाऊ आकाश याने पोलिसांना आणि कुटुंबीयांना इमरानने मुस्कानवर चाकूने हल्ला केल्याचे सांगितले. मुस्कानचा मित्र अमन यानेही इमरान तिच्या मागे बराच काळ लागला होता आणि तो तिला त्रास देत असल्याचा दावा केला. यापूर्वीही त्याने मुस्कानला त्रास दिल्याचे अमनने सांगितले. अमनच्या म्हणण्यानुसार, इमरान सुमारे 5.40 वाजता मुस्कानच्या घरात शिरला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुस्कानचा भाऊ आकाश याने त्याला ओळखल्याचेही सांगण्यात आले.

मुस्कान ज्या जिममध्ये जात होती, त्याच जिममध्ये इमरान ट्रेनर म्हणून काम करत होता, अशी माहिती आकाशने दिली. या घटनेनंतर पोलिसांनी इमरानचा शोध सुरू केला आहे. आरोपी सध्या फरार असून त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांकडून या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हत्येमागील नेमका हेतू काय होता, याचा शोध घेतला जात आहे.