Kolkata Rape Case: कोलकाता शहरातील एका 24 वर्षीय विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. एका लॉ कॉलेजच्या विद्यार्थीनीवर महाविद्यालयाच्या आवारात सामूहिक बलात्कार झाला असून पीडितेने कॉलेजच्या एक माजी विद्यार्थी आणि दोन विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. यामध्ये राज्यातील सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसच्या युवा कार्यकर्त्याचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. मनोजित मिश्रा, प्रमित मुखर्जी आणि जेब अहमद अशी आरोपींची नावं समोर आली आहेत.
ADVERTISEMENT
मेडिकल टेस्टमध्ये धक्कादायक बाबी समोर...
या प्रकरणातील पीडितेची मेडिकल टेस्ट करण्यात आली असून त्यामधून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मेडिकल टेस्टमध्ये पीडित तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याचे तसेच पीडितेच्या शरीरावर चाव्याचे आणि नखांचे व्रण आढळून आल्याचं समोर आलं आहे. यावरुन तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं. पीडित तरुणी ही कॉलेजच्या राजकीय क्षेत्रात सहभागी असून ती तृणमूल कॉंग्रेस पक्षाची समर्थक असल्याचं समोर आलं. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापलं असून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.
तरुणी कॉलेजच्या राजकीय क्षेत्रात सक्रीय
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित तरुणी राजकीय विश्वात सक्रीय असल्याचा फायदा घेतला. तरुणी बुधवारी कॉलेजमध्ये परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी गेली असता तिथे मनोजित मिश्रा नावाच्या विद्यार्थ्याने तिला कॉलेज युनियनच्या खोलीत थांबण्यासाठी सांगितले आणि युनियमध्ये महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्याचा प्रस्ताव दिला.
हे ही वाचा: शिक्षकाने विद्यार्थीनीचे नग्न फोटो काढले, 15 दिवसांपासून जेवण सोडलं, गेली 10 महिन्यांपासून...
प्रेमाला नकार देताच बळजबरीने...
तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, युनियनमध्ये महत्त्वपूर्ण पदाच्या प्रस्तावावर तरुणीने युनियनसाठी अगदी मनापासून कामाची तयारी असल्याचं सांगितलं. मात्र, मनोजितच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याने तरुणीला वर्गाबाहेर नेऊन तिच्यावर प्रेम असल्याचं सांगितलं. इतकेच नव्हे तर त्याने तिला लग्नाची मागणी घातली. तरुणीने तिच्या प्रेमाला नकार दिल्यानंतर त्याने काहीच विचार न करता तिला बळजबरीने सुरक्षा रक्षकाच्या खोलीत नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला.
त्यावेळी तरुणीने मनोजितला रोखण्यासाठी खूप प्रयत्न केले. तिने त्याचे हात जोडले आणि पाय धरुन विनवणी केली. इतकेच नव्हे, तर तरुणीचा बॉयफ्रेंड असून मनोजितसोबत लग्न करु शकत नसल्याचंही तिने सांगितलं. मात्र, त्यावेळी तरुणीचं काहीही न ऐकता आरोपीने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.
हे ही वाचा: अडीच वर्षाच्या मुलाला दाम्पत्यांकडून चटके आणि वेताचे फटके, कारण ऐकून थक्का व्हाल
पोलिसांचा तपास
पोलिसांना याप्रकरणाची तक्रार मिळताच त्यांनी घटनेच्या 12 तासांच्या आत मनोजित मिश्रा या मुख्य आरोपीसह तीनही आरोपींना अटक केली. मुख्य आरोपी कॉलेजचा माजी विद्यार्थी असून तो वकिली करतो, त्याने अत्याचार केला आणि तर इतर दोघे बाहेर पहारा देत होते, असंही पोलिसांनी सांगितले. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून तिच्यावर उपचार सुरू असल्याचं सांगितलं गेलं. राज्य सरकार आणि पोलीस हे प्रकरण खूप गांभीर्याने घेत आहेत आणि पोलीस त्यांच्या पातळीवर या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
