लव, सेक्स आणि धोका…विवाहित महिलेने प्रियकराला खेचले कोर्टात

देशभरात अनैतिक संबंधाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या घटनांमुळे गुन्ह्याचे प्रमाण देखील वाढले आहे. अशीच एक घटना आता औरंगाबादच्या नबीनगरच्या अंबा भागातून समोर आली आहे. या घटनेत एक विवाहित महिला एका तरुणाच्या प्रेमात पडली होती.

love sex and high voltage drama women want to marry her lover maharashtra crime news

love sex and high voltage drama women want to marry her lover maharashtra crime news

मुंबई तक

• 05:19 PM • 17 Jun 2023

follow google news

देशभरात अनैतिक संबंधाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या घटनांमुळे गुन्ह्याचे प्रमाण देखील वाढले आहे. अशीच एक घटना आता औरंगाबादच्या नबीनगरच्या अंबा भागातून समोर आली आहे. या घटनेत एक विवाहित महिला एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. नवऱ्याला कळून न देता साधारण तीन वर्ष दोघे नात्यात एकत्र होते. या दरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित केले होते. यानंतर विवाहित महिला तरुणावर लग्नासाठी सतत दबाव टाकत होती. या दबावाला कंटाळून प्रियकराने तिचे प्रायव्हेट व्हिडिओ तिच्याच पतीला पाठवून दिले होते.ज्यामुळे पतीने पत्नीशी संबंध तोडले होते. यानंतर महिलेने प्रियकराला कोर्टात खेचले होते. (love sex and high voltage drama women want to marry her lover maharashtra crime news)

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे नाव सोनी कुमारी असून तरुणाचे नाव अरुण कुमार आहे. महिलेचे तरुणासोबत विवाहबाह्य संबंध होते. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. म्हणूनच ते तीन वर्षे एकत्र राहिले होते. मात्र जेव्हा तरुणाला महिलेला सोडायचे होते. त्यावेळी त्याने महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ तिच्या पती आणि मेहुण्याला पाठवले होते. तरूण इतक्यावरच थांबला नाही त्याने तिचा व्हिडिओ व्हायरल देखील केला होता.

हे ही वाचा : सरस्वती वैद्यच्या हत्येचं गूढ उकललं, ‘या’ पदार्थात कीटकनाशक मिसळून हत्या

आपल्याच बायकोचे घाणेरडे व्हिडिओ एका तरूणाने पाठवल्याचे पाहून महिलेचा पती तिला सोडून गेला. यामुळे महिला तरुणावर लग्नासाठी दबाव टाकत होती. महिलेने तरुणाला औरंगाबाद येथील न्यायालयात नेले. वकिलाने दिलेल्या लग्नाच्या कागदपत्रांवर सह्या करण्यास सांगितले, मात्र तरुणाने नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली. य़ावेळी मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. माझे आयुष्य उध्वस्त होईल, असे म्हणत तरूणाने तीची माफी मागितली. मात्र महिलेने तरुणाचे काही एक ऐकले नाही. उलट ती त्याला म्हणाली की, मी मुलासह कुठे जाऊ? तुझ्या कृत्यामुळे तो मला सोडून गेला. आता तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. व्हिडिओ व्हायरल करून तू माझे आयुष्य उद्ध्वस्त केलेस, असे महिलेने तरूणाला सांगितले.

दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोघांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दोघांचे समुपदेशन सुरू आहे. दोघांमधील तोडगा लवकरच कायदेशीर मार्गाने काढला जाईल असे, महिला पोलिस ठाण्याच्या प्रमुख कुमकुम कुमारी यांनी सांगितले.

    follow whatsapp