सरस्वती वैद्यच्या हत्येचं गूढ उकललं, ‘या’ पदार्थात कीटकनाशक मिसळून हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

manoj sane killed saraswati by giving her an insecticide with buttermilk mira road case live in partner
manoj sane killed saraswati by giving her an insecticide with buttermilk mira road case live in partner
social share
google news

मीरा रोडमधील लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य (Saraswati Vaidya) हत्याकांडात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या खुलास्यांमुळे हत्याकांडाचा हळुहळु उलगडा होत चालला आहे. दरम्यान आरोपी मनोज सानेने (Manoj Sane) पोलिसांना सरस्वती वैद्यने आत्महत्या केल्याची माहिती दिली होती. मात्र आता सरस्वती वैद्यची आत्महत्या नसून ही हत्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याआधी मनोजने सरस्वतीचे तुकडे तुकडे करून कुकरमध्ये शिजवून मिक्सरमध्ये बारीक करून विव्हेवाट लावली होती, इतकीच माहिती समोर आली होती. मात्र आता सरस्वतीच्या हत्येचे खरं कारण समोर आले आहे. नेमकी मनोज सानेने तिची हत्या कशी केली आहे, हे जाणून घेऊया. (manoj sane killed saraswati by giving her an insecticide with buttermilk mira road case live in partner)

असा रचला हत्येचा कट

मीरा रोडमधील लिव्ह इन पार्टनर (Mira Road Live in Partner) हत्याकांडात मनोज सानेने सरस्वती वैद्यने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली होती. या आत्महत्येचा आरोप आपल्यावर येऊ नये, यासाठी त्याने मृतदेहाचे तुकडे तुकडे करून शिजवून, मिक्सरला लावून त्याची विल्हेवाट लावल्याची माहिती दिली होती.मात्र पोलिसांनी त्यांच्या जबाबावर विश्वास न ठेवता कसून तपास करून घटनेची उकल केली आहे.

हे ही वाचा : Thane Crime: सेलोटेपने गुंडाळलेल्या ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाचं गूढ अखेर उघडकीस

मनोज सानेने (Manoj Sane) सरस्वतीला ताकातून कीटकनाशक मारणार औषध देऊन तिला ठार केलं आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मनोज साने याने बोरीवली येथील दुकानातून किटकनाशक घेतले होते. हे कीटकनाशक त्याने ताकात मिसळून सरस्वतीला दिले होते. तसेच ज्या दुकानातून मनोज सानेने कीटकनाशक खरेदी केले होते, त्या दुकानदाराने देखील त्याची ओळख पटवली आहे. तसेच कीटकनाशक विकल्यानंतर त्याचं नाव, त्याचा बॅच नंबर या सगळ्याची नोंद दुकानदार त्यांच्या रजिस्टरमध्ये करत असतात. त्यामुळे सानेच्या घरी जे कीटकनाशक सापडलं ते किटकनाशक आणि दुकानदाराच्या दुकानातील नोंद यावरचे तपशील सारखेच आहेत. हे कीटकनाशक जप्त करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दुर्गंधी टाळण्यासाठी रुम फ्रेशनरचा वापर

दरम्यान मनोज सानेने (Manoj Sane) सरस्वतीच्यी हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाला निलगीरीचं तेल लावलं होतं. तसेच मृतदेहाला दुर्गंधी येऊ नये म्हणून रूम फ्रेशनरही मारले होते. पोलिसांनी मनोज सानेच्या घरातून निलगिरी तेलाच्या पाच बाटल्या जप्त केल्या आहेत. मनोजने ज्या दुकानातून निलगिरीच्या बाटल्या खरेदी केल्या होत्या, त्या दुकानदाराचेही जबाब देखील नोंदवण्यात आले आहेत.

घटनाक्रम काय?

पोलीस अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, मनोज साने आणि सरस्वती वैद्य 2014 पासून एकत्र राहत आहेत. मात्र गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्यात खटके उडत होते. या दरम्यान 3 जूनला मनोज साने आणि सरस्वती वैद्य यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात सरस्वतीने मनोजला, तू माझ्याशी पूर्वीसारखा वागत नाहीस. तसेच तू बेडरूममध्ये झोपू नकोस हॉलमध्ये झोप असं बजावलं होत. या घटनेमुळे चिडलेल्या मनोज सानेने 4 जूनला ताकात किटकनाशक देऊन सरस्वती वैद्यची हत्या केली होती. या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून गॅसवर भाजले त काही तुकडे नाल्यात फेकले होते. या दरम्यान घरातून प्रचंड दुर्गधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले, त्यानंतर 7 जूनलाही घटना उघडकीस आली होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा :  Anjali Murder Case : मंदिर, आई आणि मर्डर… अल्पवयीन मुलीनेच रचला भयंकर कट

    follow whatsapp

    ADVERTISEMENT