Majhi Ladki Bahin yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मदतीचे खोटे आश्वासन देणाऱ्या तिघांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या योजनेअंतर्गत सायबर गुन्हे आणि मनी लॉन्ड्रिग प्रकरणातून उकळलेले पैसे इतर लोकांच्या बनावट बँक खात्यात जमा करण्यात आले. पुरुषांसह अनेक लोकांच्या नावे बँक खाती उघडण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अविनाश कांबळे (वय 25) आणि अन्य आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : "पापाचा घडा भरला होता, पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं होतं...", लेफ्टनंट जनरल म्हणाले आरपारची तयारी होती
या प्रकरणात अधिकाऱ्यांनी माहिती देत मोठा गौप्यस्फोट केला की, या खात्याद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करण्यात आले आहेत. यामुळे अवैधमार्गे मिळवलेल्या काळ्या पैशांचे पांढऱ्या पैशात रूपांतर करणे हा काळाबाजार समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अशातच पोलिसांनी केलेल्या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, गरीब वर्गातील निष्पाप जनतेला आमिष दाखवत आरोपी त्यांचे बँक खाते सायबर गुन्हेगारांना विकले जात होते. जुहू पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, यामध्ये 2 हजार 500 बँक खाती उघडण्यात आली आहेत.
यापैकी काही खाती ही गुन्हेगारांना विकल्याचं वृत्त आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यात आरोपी हे गुजरातमधील सुरत येथील आहेत. यामुळे पोलिसांनी संबंधित बँक खाती आणि त्यांचा अर्थव्यवहार तात्काळ गोठवला आहे. दरम्यान, एकूण 19 लाख 43 हजार 779 रुपये जप्त करण्यात आलेत.
या प्रकरणात पीडित पुरूषांनी माहिती दिली की, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 1 हजार 500 रुपये सरकारकडून आर्थिक मदतीचे आश्वासन दिले होते. ही योजना केवळ लाभार्थी महिलांसाठी आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील घोटाळ्याचा गौप्यस्फोट हा मुंबईतील विलेपार्ले येथील नेहरू नगरमधील झुग्गी वस्तीत झाला. ज्यात एका मजुराने संबंधित प्रकरणाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
ADVERTISEMENT
