मुंबईत दिसला ड्रोन, पोलिसांचीही उडाली भंबेरी.. नेमकं काय घडलं?

Mumbai crime news : मुंबईत अवैधपणे ड्रोन उडवणाऱ्या तरुणाच्या मुंबई पोलिसांनी अटक करत कारवाई केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Mumbai crime news Drone Operation

Mumbai crime news Drone Operation

मुंबई तक

12 May 2025 (अपडेटेड: 12 May 2025, 06:22 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत एका तरुणाने अवैधपणे ड्रोन चालवल्याने मुंबई पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

point

ड्रोन ऑपरेशन्सवर बंदी घालण्यात आल्यानंतर हा प्रकार घडला

Mumbai crime news : भारत पाकिस्तान युद्धामुळे देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत एका तरुणाने अवैधपणे ड्रोन उडवल्याने मुंबई पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. युद्धाचा तणाव पाहता, ड्रोन ऑपरेशन्सवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतरच हा प्रकार उघडकीस आला. 

हे वाचलं का?

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 12 मे रोजी रात्री 12. 30 वाजता घडली होती. त्यानंतर शहर नियंत्रण कक्षाला पवई परिसरात साकी विहार रोडवरील सोलारिस कॉम्प्लेक्समध्ये ड्रोन कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. 

हेही वाचा : "पापाचा घडा भरला होता, पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं होतं...", लेफ्टनंट जनरल म्हणाले आरपारची तयारी होती

या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या तपासादरम्यान, पोलिसांनी अधिक माहिती गोळा केली. या तपासातून ड्रोन उडवणारा तरुण हा पवई येथील रहिवासी आहे. तो मूळचा हैदराबादचा निवासी असून अंकित ठाकूर (वय 23) असे त्याचे नाव असल्याची माहिती समोर आली.   

पोलिसांनी त्या तरुणासह त्याचं ड्रोनही ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान अंकितने सांगितलं की, त्याने एका वर्षांआधी ड्रोनची चाचणी केली असता, संबंधित ड्रोनमध्ये बिघाड झाल्याने ते पडले.

हेही वाचा :  SSC Result 2025: दहावीचा निकाल पाहण्याची तयारी करून ठेवा, इथे पाहू शकता Result

या प्रकरणात त्यानं अवैधपणे ड्रोन उडवलयाचे मान्य केले. तो म्हणाला की, ड्रोन उडवण्यासाठी पोलिसांकडून कोणताही परवानगी घेतली नव्हती. यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी ड्रोन ऑपरेशन्सबाबत जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. याचपार्श्वभूमीवर संबंधित ड्रोन उडवणाऱ्या तरुणाला 223 भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 

    follow whatsapp