SSC Result 2025: दहावीचा निकाल पाहण्याची तयारी करून ठेवा, इथे पाहू शकता Result
SSC Result 2025 Result Latest Update : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या यंदाच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दहावीचा निकाल कोणत्या तारखेला लागणार?

कोणत्या वेबसाईटवर पाहू शकता दहावीचा निकाल?

SSC च्या निकालाबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
SSC Result 2025 Result Latest Update : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा यंदाच्या परीक्षेचा निकाल 13 मे 2025 रोजी जाहीर होणार आहे. मागील काही दिवसांपासून निकाल कधी जाहीर होणार? याबाबत विद्यार्थ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज (12 मे) निकालाच्या तारखेची बोर्डाकडून घोषणा करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच 12वीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आता 10वीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आता दहावीच्या विद्यार्थ्यांनी नेमका कोणत्या वेबसाइट्सवर आपला निकाल पाहावा याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
मागील वर्षी दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात आला होता. 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यामध्ये 8,64,120 मुलांचा समावेश होता. तर 7,47,471 मुली आणि 19 ट्रान्सजेंडर दहावीच्या परीक्षेला बसले होते. दरम्यान, यंदाच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख आता शिक्षण मंडळाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.
हे ही वाचा >> प्रेयसीला भेटायला घरी गेला, घरच्यांनी मुलीच्या हाती दिलं ब्लेड अन् प्रियकराचं गुप्तांगच कापलं...
या वेबसाईट्सवर पाहू शकता दहावीचा निकाल
- https://mahresult.nic.in
- https://sscresult.mkcl.org
- https://sscresult.mahahsscboard.in
- https://results.digilocker.gov.in
हे ही वाचा >> पुण्याच्या बिझनेसमनला 'तो' मोह पडला महागात, बिहारमध्ये कोणी घेतला जीव?
मंत्री आशिष शेलार यांनी MSBSHSE आणि आयटी विभागासोबत नुकतीच बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, लाखो विद्यार्थी जेव्हा बोर्डाच्या वेबसाईटवर लॉग इन करतात, तेव्हा वेबसाईटवर लोड येतो. यामुळे तांत्रिक अडचणी आणि ओव्हरलोडची स्थिती निर्माण होते. त्यांनी अधिकाऱ्यांना वेबसाईटची क्षमता वाढवण्यासाठी आणि सायबर सुरक्षेबाबत उपाययोजना राबवण्यासाठी निर्देश दिले होते.
SSC Result 2025: दहावीचा निकाल कसा पाहता येणार?
- सगळ्यात आधी MSBSHSEच्या Mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
- होम पेजवर असलेल्या महाराष्ट्र दहावीचा निकाल 2025 या लिंकवर क्लिक करा.
- लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट पेज सुरु होईल.
- यावेळी विद्यार्थ्यांना त्यांचा जो सीट नंबर किंवा नोंदणी क्रमांक (जो हॉल तिकीटवर) असतो तो रिझल्ट पेजमध्ये टाकावा.
- त्यानंतर खालच्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाचे पहिले तीन अक्षर टाकावे लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना सब्मिट हे बटण दाबावं लागणार आहे.
- समजा, तुमचा सीट नंबर M582315 असेल आणि तुमच्या आईचे नाव सुमन असं असेल तर तुम्ही M582315 हा तुमचा सीट नंबर टाकून पुढच्या बॉक्समध्ये आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUM असं टाकावं लागेल.
- त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा.
- सबमिट बटणारवर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा निकाल तात्काळ स्क्रीनवर पाहायला मिळेल.