प्रेयसीला भेटायला घरी गेला, घरच्यांनी मुलीच्या हाती दिलं ब्लेड अन् प्रियकराचं गुप्तांगच कापलं...
रात्री आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला मुलीच्या घरच्यांनी रंगे हात पकडलं आणि त्यानंतर मुलीच्या भावांनी त्याला बेदम मारहाण केली आणि मुलीकडून त्याचा प्रायव्हेट पार्ट म्हणजेच गुप्तांगच कापून टाकलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रात्री प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या मुलासोबत घडला धक्कादायक प्रकार
मुलीनेच ब्लेडने कापलं मुलाचं गुप्तांग
रात्री प्रेयसीला भेटायला गेल्यावर नेमकं काय घडलं?
Shocking Crime News: गोरखपूर: उत्तर प्रदेशातील गोरखपूर शहरात एक खळबळजनक घटना घडल्याचं समोर आलं आहे. रात्री आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला मुलीच्या घरच्यांनी रंगेहाथ पकडलं आणि त्यानंतर मुलीच्या भावांनी त्याला बेदम मारहाण केली. मुलीचे कुटुंबीय एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी चक्क मुलीच्या हातात ब्लेड देऊन तरुणाचं गुप्तांगच कापून टाकलं. असा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, अगदी गंभीर स्वरुपात जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यासंदर्भात दोन्ही कुटूंबाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
खरंतर, गोरखपूरच्या गुलरीहा पोलीस स्टेशन परिसरातील सरैया बाजारात राहणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार केली आणि सांगितले की, त्याचा 22 वर्षांचा मुलगा रात्री शेतातून परतत होता. दरम्यान, घरापासून काही अंतरावर राहणाऱ्या एका मुलीने त्याला फोन केला. ती मुलगी मुलापेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे आणि ती २ वर्षांपासून त्याच्या मुलाशी फोनवर बोलत आहे.
रात्री प्रेयसीला भेटायला गेल्यावर काय घडलं?
मुलीने तरुणाला रात्री भेटायला बोलवलं होतं. पण तेव्हाच मुलीच्या चार भावांनी तरुणाला पकडलं आणि बेदम मारहाण केली. त्या चौघांनीही मुलीचे दोन्ही हात आणि पाय धरले आणि नंतर तिला ब्लेड देऊन त्या मुलाचे गुप्तांग कापायला लावले. यानंतर मुलीच्या घरच्यांनी तरुणाला घराबाहेर हाकलवून दिले.
हे ही वाचा: पुण्याच्या बिझनेसमनला 'तो' मोह पडला महागात, बिहारमध्ये कोणी घेतला जीव?










