पुण्याच्या बिझनेसमनला 'तो' मोह पडला महागात, बिहारमध्ये कोणी घेतला जीव?

मुंबई तक

पुण्यातील कोथरूड शहरात राहणाऱ्या 55 ​​वर्षीय व्यावसायिकाची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मृत्यूची बातमी समोर येण्यापूर्वी त्यांचे नातेवाईक विशाल लवाजी लोखंडे यांनी 12 एप्रिल रोजी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये लक्ष्मण बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.

ADVERTISEMENT

पुण्यातील कोथरूड शहरात राहणाऱ्या 55 ​​वर्षीय व्यावसायिकाची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
पुण्यातील कोथरूड शहरात राहणाऱ्या 55 ​​वर्षीय व्यावसायिकाची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील व्यावसायिकांची बिहारमध्ये हत्या

point

कंपनीच्या मेल आयडीवर मॅसेज करुन बिहारमध्ये बोलावलं

point

बिहारमध्ये बोलवून हत्या करणं... नेमकं प्रकरण काय?

पुणे: पुण्यातील कोथरूड शहरात राहणाऱ्या 55 ​​वर्षीय व्यावसायिकाला बिहारमध्ये बोलावून त्याची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बिहारच्या पाटणा शहरात घडली आहे. लक्ष्मण साधु शिंदे असं मृत व्यावसायिकाचे नाव आहे. या व्यावसायिकाच्या मृत्यूची बातमी समोर येण्यापूर्वी त्यांचे नातेवाईक विशाल लोखंडे यांनी 12 एप्रिल रोजी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये लक्ष्मण हे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.

कंपनीच्या मेल आयडीवर मॅसेज करुन बिहारला बोलावलं

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील खेडशिवापूर भागात लक्ष्मण शिंदे यांची एक कंपनी आहे. याच कंपनीच्या ईमेल आयडीवर मेल पाठवून त्यांना बिहारला बोलावण्यात आले. त्यांच्या कंपनीला आवश्यक असलेली मशीन्स आणि इतर उपकरणे त्यांना कमी अत्यंत कमी किंमतीत पुरवली जातील असे मेलमध्ये लिहिले होते. या मोहापायी लक्ष्मण शिंदे हे फारशी चौकशी न करता थेट बिहारला गेले. पाटणा विमानतळावर उतरल्यावर त्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी शेवटचा संवाद झाला होता. पण त्यानंतर त्यांचा कुटुंबातील सदस्यांशी कोणताही संपर्क झाला नाही. त्यामुळे ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात नोंदविण्यात आाली.

हे ही वाचा: Waqf Act: आताची सगळ्या मोठी बातमी, मोदी सरकारला झटका.. वक्फ कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

या प्रकरणी पुणे पोलिसांनी तपासाची सगळी चक्रं फिरवली. तेव्हा त्यांना लक्ष्मण शिंदेंच्या फोनचे शेवटचे लोकेशन हे  बिहारमधील पाटणा येथे सापडलं. या आधारावर पुणे पोलिसांचे एक पथक तपासासाठी बिहारला गेले. त्यावेळी त्यांनी पाटणा पोलिसांची मदत घेतली. तपासादरम्यान, लक्ष्मण शिंदे यांच्या बँक खात्यातून कोणीतरी 90000 रुपये काढल्याचे समोर आले. या तपासादरम्यान, 14 एप्रिल रोजी जहानाबाद जिल्ह्यात लक्ष्मण शिंदेंचा मृतदेहच सापडला.

हे वाचलं का?

    follow whatsapp