Crime News: कर्नाटकातील चिक्काबल्लापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रकरणातील पीडितेने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या पुरुषासोबत लग्न केलं आणि त्याच्यापासून ती गर्भवती राहिली. मात्र, पीडिता गर्भवती राहिल्यानंतर काही महिन्यांतच संबंधित पुरुषाने कुटुंबियांच्या विरोधाचं कारण सांगून त्याने पीडितेला सोडून दिलं आणि दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर आरोपीने पीडितेच्या मुलीचाही विनयभंग केल्याचा आरोप कीर्तीने करण्यात आला.
ADVERTISEMENT
दुसऱ्या तरुणासोबत केलं लग्न
खरंतर, किर्ती नावाच्या एका महिलेने 2022 मध्ये तिच्या पतीला गमावलं. पतीच्या मृत्यूनंतर, कीर्ती तिच्या लहान मुलीसोबत एकटी राहत होती आणि त्यावेळी उदरनिर्वाह करण्यासाठी तिने एका खाजगी कंपनीत काम करायला सुरुवात केली. यादरम्यान, संबंधित महिलेची सुनील नावाच्या एका तरुणासोबत ओळख झाली. सुनील किर्तीला भेटण्यासाठी बऱ्याचदा तिच्याकडे जायचा. दोघांमधील मैत्रिचा संवाद कालांतराने वाढत गेला आणि सुनीलने किर्तीला तिच्यासोबत लग्न करण्याचं आश्वासन दिलं.
खोटं कारण सांगून पीडितेला सोडून दिलं अन्...
त्यानंतर कीर्तीने सुनीलशी लग्न केलं आणि दोघांनीही चिक्कबल्लापूर उप-नोंदणी कार्यालयात त्यांच्या लग्नाचं रीतसर रजिस्ट्रेशन केलं. परंतु, पुढे काहीतरी वेगळंच घडलं. लग्नाच्या काही महिन्यांनंतर, कीर्ती आठ महिन्यांची गर्भवती राहिली आणि तेव्हाच सुनीलचा खरा चेहरा समोर आला. कुटुंबियांचा विरोध असल्याचा बहाणा सांगून त्याने कीर्तीला सोडून दुसऱ्या मुलीशी लग्न केलं.
हे ही वाचा: मुंबईकरांची दाणादाण, 'या' भागांमध्ये गुडघाभर पाणी, अंधेरीतील सबवे बंद, धडकी भरवणारा पाऊस
मारहाण केल्याचा देखील आरोप
खरंतर, सुनील किर्तीला सोडून गेल्यानंतर ती एकटी पडली. कीर्ती सुनीलपासून गर्भवती होती आणि तिला एक मुलगी सुद्धा होती. अशा परिस्थितीत पीडिता न्याय मागण्यासाठी सुनीलच्या घरी पोहोचली असता तिला तिथे मारहाण करण्यात आल्याचा देखील आरोप पीडितेनं केला. त्यावेळी सुनीलच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी पीडितेवर हल्ला केला. परिस्थिती बिकट होत असल्याचं पाहता 112 नंबर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी यातून कीर्तीची सुटका केली. यानंतर तिला चिक्कबल्लापूर येथील प्रसूतिगृह आणि बाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
हे ही वाचा: पालघरमध्ये ढगफुटी सदृश्यस्थिती, पोल्ट्री फार्ममधून असंख्य कोंबड्या गेल्या वाहून, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
पीडितेच्या मुलीचा विनयभंग
सुनीलने पीडितेच्या मुलीचाही विनयभंग केल्याचा आरोप कीर्तीने केला. या आरोपामुळे प्रकरण अधिक गंभीर झालं. काही वर्षांपूर्वी सुद्धा कीर्तीने सुनीलविरोधात महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी सुनीलने एका लेखी पत्रावर सही करत त्याच्या पत्नीची आणि जन्माला येणाऱ्या बाळाची पूर्णपणे काळजी घेण्याचं आश्वासन दिले होते, परंतु ती आश्वासने फक्त कागदावरच राहिली. आता या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
