Extra marital affairs : देशभरात सध्या अनैतिक संबंधांच्या अनेक घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत. पुतण्या आणि काकीची अशीच एक अगळीवेगळी प्रेमकथा उत्तर प्रदेशातील कौशंबी येथून समोर आली आहे. दोघांनीही समाजाच्या विरोधात जाऊन प्रेमसंबंध ठेवले. भविष्यात याचा काय परिणाम होईल याची त्यांनी किंचितशीही चिंता केली नाही. दोन वर्षांच्या प्रेमसंबंधात पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडले असता, त्याने संताप व्यक्त केला. त्यानंतर दोघांनाही भेटण्यास सक्तीची मनाई केली. दरम्यान, हे प्रकरण मंझनपूर कोतवाली परिसरातील हटवा रामपूर येथील आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबईकरांची दाणादाण, 'या' भागांमध्ये गुडघाभर पाणी, अंधेरीतील सबवे बंद, धडकी भरवणारा पाऊस
नेमकं प्रकरण काय?
संबंधित प्रकरणात काकूलाही तिच्या पुतण्यापासून वेगळं राहणं सहन झालं नाही. ना पुतण्याला त्याच्या काकूशिवाय वेगळं राहण शक्य झाले. घरात वाद उफळू लागला असता, हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले. तिथे नाते टिकवण्यासाठी तडजोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला असता, काकूने विष प्राशन करून आत्महत्या केली. पुतण्याला हे समजताच त्यानेही काकूच्या जाण्याने स्वत: विष प्राशन करत पुतण्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो तिथेच आपला जीव मुठीत धरून जगत होता.
हटवा मंझनपूर कोतवाली परिसरातील हटवा रामपूर येथील रहिवासी 36 वर्षीय पिंटूचा विवाह विमला देवीशी झाले होते. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित होते. दोघांनाही तीन मुले होती आणि दोघांचाही सुखाचा संसार सुरू होता. मात्र, नंतर विमला देवीला आपला पुतण्या विशोक उर्फ रामराजशी चांगली मैत्री झाली होती. नंतर त्यांचं मैत्रीचं नात्यात रुपांतर झाले. विमलाचा पती हा कामासाठी बाहेर असायचा. तेव्हाच विमला आणि विशोक यांच्यातील मैत्री अधिकच वाढू लागील. ते एकमेकांना भेटू लागले होते.
पतीने पत्नीला पाहिलं आक्षेपार्ह परिस्थितीत
पण संबंधित प्रेमप्रकरण जेव्हा कुटुंबासमोर आले तेव्हा त्या नात्याला अनेकांनी विरोध केला. जेव्हा पती पिंटूनं दोघांनाही पाहिले असता, त्याने विमलला विशोकला भेटण्यापासून रोखले गेले. कंटाळून विमलाने विष प्राशन करत आत्महत्या केली. त्यानंतर काकीच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर विशोकनेही विष प्यायलं. त्यानंतर दोघांनाही एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हे ही वाचा : संगिताचा शिक्षक मद्यधुंदावस्थेत विद्यार्थिनींना करायचा फोन अन् भेटायला बोलवायचा, नकार दिल्यास द्यायचा धमकी
विशोकची आई गुडिया देवीनं सांगितलं की, विमला आणि विशोक हे एकमेकांशी फोनवर बोलायचे. दोघांमध्ये तडजोडही झाली होती, पण शेवटी विमलाने आत्महत्या केली. त्यानंतर माझा मुलगा विशोकनेही आत्महत्या करत टोकाचं पाऊल उचललं.
दरम्यान, विमलाच्या भावाने विशोकवर धक्कादायक आरोप केला आहे. तो म्हणाला की, त्याने विमलासोबत शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळेच विमलाने आत्महत्या करत टोकाचं पाऊल उचललं आहे. नाही,तर हे पाऊल उचललं नसतं, असा आरोप विमलाच्या भावाने केला आहे.
ADVERTISEMENT
