Model Murder : हात-पाय बांधून मृतदेह फ्रिजमध्ये कोंबला, सुप्रसिद्ध मॉडेलच्या हत्येने खळबळ

प्रशांत गोमाणे

• 03:58 AM • 29 Oct 2023

एका 31 वर्षीय सुप्रसिद्ध मॉडेलची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हत्येनंतर मॉडेलचा मृतदेह फ्रिजमध्ये कोंबण्यात आला होता. या मॉडेलचे नाव मेलिसा मुनी असून ती दोन महिन्याची गर्भवती होती.

model maleesa moony dead body found in fridge ankles wrists tied us los angeles america story

model maleesa moony dead body found in fridge ankles wrists tied us los angeles america story

follow google news

America Model Murder : दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं होतं. आता याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. एका 31 वर्षीय सुप्रसिद्ध मॉडेलची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हत्येनंतर मॉडेलचा मृतदेह फ्रिजमध्ये कोंबण्यात आला होता. या मॉडेलचे नाव मेलिसा मुनी (maleesa moony)  असून ती दोन महिन्याची गर्भवती होती. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने आता एकच खळबळ उडाली आहे. (model maleesa moony dead body found in fridge ankles wrists tied us los angeles america story)

हे वाचलं का?

अमेरिकेच्या (America) लॉस एंजेलिसमधील एका अपार्टमध्ये 31 वर्षीय मेलिसा मुनीची तिच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली होती. 12 सप्टेंबरला ही घटना उघडकीस आली होती.मेलिसाचा मृतदेह हात-पाय बांधलेल्या अवस्थेत फ्रिजमध्ये आढळून आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. आता मॉडेलचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. या पोस्टमार्टम रिपोर्टमधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

हे ही वाचा : अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत? देवेंद्र फडणवीसांनी नेमंक ते सांगितलं

पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, मेलिसा मुनीही दोन महिन्याची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर मृत्यूपुर्वी तिची आरोपीशी झटापट झाल्याचेही कळतेय. कारण तिच्या शरीरावर जखमेचे काही निशाण आढळले आहेत. न्युयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, मेलिसा मुनीच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, पाठीवर आणि डाव्या हातावर जखमा आढळल्या आहेत. टॉक्सिकोलॉजीच्या अहवालानुसार मेलिसाच्या शरिरात बेंझायलेकगोनिन सारख्या औषधांची तसेच कोकेथिलिन आणि इथेनॉलचे मिश्रण असल्याचे दिसून आले आहे. तसेच मृत्यू आणि ड्रग्जच्या नशेत असणाऱ्या मॉडेलला आरोपीनं बेदम मारहाण केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता.

पोस्टमार्टम रिपोर्टमधून हेच स्पष्ट होतं की मॉडेलच्या हत्येपुर्वी तिचा आरोपीशी वाद झाला होता. या वादातूनच दोघांमध्ये झटापटी झाली. या झटापटीनंतर आरोपीने तिची हत्या केली होती. या हत्येनंतर तिच्या तोंडावर पट्टी लावली, हात-पाय बांधले आणि मृतदेह फ्रिजमध्ये कोंबला होता.

मेलिसाच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूच्या वेळी ती दोन महिन्याची गर्भवती होती. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेलिसाच्या आयक्लाऊडवर एक अलर्ट मॅसेज देखील सापडला आहे. ज्यावरून स्पष्ट होत की तिचे डिवाईस इतर कोणी वापरत होतं. तसेच तिचा आयफोन आणि मॅकबुक देखील बंद करण्याचा प्रयत्न झाला आहे, दरम्यान या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली नाही आहे. मात्र पोलीस या घटनेत कसून तपास करत आरोपीचा शोध घेत आहेत.

    follow whatsapp