Mumbai : दरवाजा उघडला आणि चादरीत सापडला मृतदेह, धारावीत भयंकर हत्याकांड

Delivery Boy killed Neighbour : मुंबईत एका डिलिव्हरी बॉयने (Delivery Boy) दारू पार्टी करताना वाद झाल्याने शेजाऱ्याची हत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. या हत्येनंतर आरोपीने शेजाऱ्याचा मृतदेह चांदरीत गुंडाळून त्याच्यात घरात लपवून ठेवला होता.

mumbai Dharavi delivery boy killed neighbour after argument dead body covered bedsheet

mumbai Dharavi delivery boy killed neighbour after argument dead body covered bedsheet

मुंबई तक

13 Jun 2023 (अपडेटेड: 13 Jun 2023, 03:08 PM)

follow google news

Delivery Boy killed Neighbour : मुंबईच्या धारावीतील एका डिलिव्हरी बॉयने (Delivery Boy) दारू पार्टी करताना वाद झाल्याने शेजाऱ्याची हत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. या हत्येनंतर आरोपीने शेजाऱ्याचा मृतदेह चांदरीत गुंडाळून त्याच्यात घरात लपवून ठेवला होता. या घटनेनंतर मृत व्यक्तीच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने स्थानिकांना संशय आला होता.म्हणून त्यांनी पोलिसांना (Police) बोलावून याचा तपास केला असता, ही घटना उघडकीस झाली. या घटनेनंतर पोलिसांनी तपास करून आरोपी जेम्स पॉल कानारनला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे. (mumbai delivery boy killed neighbour after argument dead body covered bedsheet)

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहू नगर पोलिस ठाणे हद्दीत फुड डिलिव्हरीचे काम करणाऱ्या जेम्स पॉल कानारने मृत व्यक्तीला शुक्रवारी आपल्या घरी दारू पार्टीसाठी आमंत्रित केले होते. दोघांनी मस्त पार्टी केली आणि दारू प्यायली. या दरम्यान पार्टी करताना दोघांमध्ये मोठे वाद झाले होते. या वादातून जेम्स पॉल कानारने मृत व्यक्तीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर आरोपी जेम्स पॉल कानारने मृतदेह एका चांदरीत गुंडाळून मृत व्यक्तीच्याच घरातील बेडवर ठेवून घटनास्थळावरून पळ काढला होता.

हे ही वाचा : Anjali Murder Case : पोटच्या पोरीनेच प्रियकराच्या मदतीने काढला आईचा काटा, कारण…

दरम्यान या हत्येनंतर ज्यावेळेस अनेक नागरीक मृत व्यक्तीच्या घरी गेले होते. त्यावेळेस घऱाचे दरवाजे उघडले नाही. याउलट घरातून दुर्गंधी येत होती.त्यामुळे स्थानिकांनी पोलिस ठाण्यात (Police) या घटनेची माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला असता, मृत व्यक्तीच्याच घरात त्याचा मृतदेह चांदरीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळला होता. ही घटना रविवारी उघडकीस आली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली होती.

पोलिसांनी (police) या प्रकरणाचा तपास करून फुड डिलिव्हरीचा एजंट असलेल्या जेम्स पॉल कानारला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. दरम्यान पोलिस या प्रकरणाचा सध्या तपास करत आहेत. आरोपी आणि मृत व्यक्तींमध्ये कोणत्या कारणामुळे भांडण झाले. तसेच आरोपीने शेजाऱ्याची हत्या कशी केली? या सर्व गोष्टीचा तपास केला जात आहे.

    follow whatsapp