Ajaz khan news: टीव्ही आणि चित्रपट अभिनेता एजाज खान पुन्हा एकदा वादात सापडला आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून मुंबईतील चारकोप पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपट उद्योगात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने एजाजने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप महिलेनं केला आहे.
ADVERTISEMENT
महिलेनं एजाज खानवर काय आरोप केले?
हे ही वाचा >> भरधाव मर्सिडीजने दुचाकीला उडवलं, 23 वर्षीय कुणाल जागीच ठार, एक जण जखमी; कारमध्ये कोण कोण होतं?
30 वर्षीय महिलेनं तिच्या तक्रारीत म्हटलं आहे की, एजाज खानने तिला चित्रपटांमध्ये भूमिका मिळवून देण्याचं आमिष दाखवून गैरफायदा घेतला. एजाजने आपल्यावर अनेक ठिकाणी बलात्कार केल्याचा आरोप या पीडितेनं केला आहे. पीडितेनं सांगितलं की, एजाजने तिला विश्वासात घेतलं आणि शोषण केलं.
पोलिसांनी दाखल केला एफआयआर
महिलेच्या तक्रारीच्या आधारे चारकोप पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमांखाली एजाज खानविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि लवकरच एजाजला चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं.
नेहमी वादात असतो एजाज खान
एजाज खान कायदेशीर अडचणीत अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. 'हाऊस अरेस्ट' नावाच्या वेब शोमुळे तो सध्या वादात आहे. हा शो उल्लू नावाच्या अॅपवर प्रसारित करण्यात आला होता. या शोमध्ये एजाजवर महिलांना अश्लील दृश्यं करण्यासाठी दबाव आणण्याचा आणि आक्षेपार्ह प्रश्न विचारण्याचा आरोप होता. या शोच्या अनेक क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरलही झाल्या होत्या.
हे ही वाचा >> चौथ्या बायकोचा खून करून नवऱ्याने बेडरूममध्ये केलं धक्कादायक कृत्य! लोकांनी केला घटनेचा पर्दाफाश
हाऊस अरेस्ट प्रकरणी चौकशी सुरू
पोलिसांनी सांगितलं आहे की, या प्रकरणातील सर्व तथ्यांची सखोल चौकशी केली जाईल आणि आरोप खरे आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. एजाजकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
'हाऊस अरेस्ट' शोचे सर्व भाग काढून टाकले
बिग बॉस फेम अभिनेता एजाज खानचा वेब शो 'हाऊस अरेस्ट' सध्या अश्लील कंटेंटमुळे वादात सापडला आहे. शोमध्ये दाखवलेल्या आक्षेपार्ह आणि उत्तेजक दृश्यांमुळे प्रेक्षकांनी तीव्र निषेध केला. वाद वाढल्यानंतर, उल्लू अॅपने या शोचे सर्व भाग त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहेत. एवढंच नाही, तर एजाज खान आणि शोशी संबंधित इतरांविरुद्ध मुंबईतील अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्लीलता पसरवणं आणि महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणं यासारख्या गंभीर आरोपांची चौकशी सुरू केली आहे.
ADVERTISEMENT
