muzaffarpur mother son double murder case : मुजफ्फरपूरमधील कांटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या आई आणि सहा वर्षांच्या मुलाच्या दुहेरी हत्येच्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या हत्येमागे प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद हे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी विकास पासवान याला अटक करण्यात आली असून, त्याच्या सांगण्यावरून सहा वर्षीय आर्यन कुमारचा मृतदेहही ताब्यात घेण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Astrology : बुधाचा कर्क राशीत प्रवेश, ऑगस्ट महिन्यात 'या' राशींचं नशीब चमकणार
मुलामुळे आईच्या हत्येचं गुपित उलगडण्याची भीती, त्यालाही संपवलं
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 23 जुलै रोजी विकास पासवान याने मंजू देवी यांना बागेत बोलावले होते. तेथे दोघांमध्ये त्यांच्या संबंधांवरून वाद झाला आणि त्यानंतर आरोपीने मंजू देवी यांची हत्या केल्याचा आरोप आहे. त्या वेळी त्यांचा सहा वर्षांचा मुलगा आर्यनही घटनास्थळी उपस्थित होता. या घटनेचे सत्य बाहेर येईल या भीतीने आरोपीने आर्यनचीही हत्या केल्याचा पोलिसांचा दावा आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात 'या' जिल्ह्यांना मान्सून झोडपणार, IMD चा अलर्ट
पोलिसांच्या तपासानुसार, दोन्ही हत्या केल्यानंतर आरोपीने आई आणि मुलाचे मृतदेह बागेतील वेगवेगळ्या झुडपांमध्ये लपवून ठेवले. 27 जुलै रोजी मंजू देवी यांचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर सुमारे दहा दिवसांनी त्याच परिसरात जवळपास 100 मीटर अंतरावर असलेल्या झुडपांमधून दुर्गंधी येत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी शोधमोहीम राबवण्यात आली. त्यावेळी झुडपांमधून सहा वर्षीय आर्यनचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली. घटनास्थळावरून रक्ताने माखलेले कपडे, मुलाची चप्पल तसेच इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले. तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे तपासाची दिशा विकास पासवान याच्याकडे वळली.
अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या
मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याच्या सांगण्यावरून आर्यनचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. तसेच मृत महिलेचा मोबाईल फोन आणि हिरव्या रंगाच्या द्रवाने भरलेली प्लास्टिकची बाटलीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. हे सर्व साहित्य पुढील तपासासाठी जतन करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, जप्त केलेल्या सर्व पुराव्यांची फॉरेन्सिक आणि वैज्ञानिक तपासणी केली जाणार आहे. या तपासातून प्रकरणातील घटनाक्रम अधिक स्पष्ट होण्यास मदत होईल. प्राथमिक तपासात मंजू देवी आणि विकास पासवान हे शालेय जीवनापासून एकमेकांना ओळखत असल्याचे समोर आले आहे. दोघांमध्ये दीर्घकाळ संबंध असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले असून, दोघांची वेगवेगळी लग्ने झाल्यानंतरही त्यांच्यात संपर्क कायम असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
चौकशीदरम्यान आरोपीने मंजू देवी यांचे अन्य एका व्यक्तीसोबत संबंध असल्याची माहिती मिळाल्यामुळे तो नाराज होता, असे पोलिसांनी सांगितले. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून महिलेची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या आर्यनने संपूर्ण प्रकार पाहिल्यामुळे हा गुन्हा उघड होईल या भीतीने त्याचीही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणात मंजू देवी यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून विकास पासवानसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून त्याचे वडील हरी पासवान यांनाही अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. या प्रकरणात इतर कोणाची भूमिका होती का, याचाही तपास सुरू असून तपासात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्याविरोधात नियमानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच वैज्ञानिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या प्रकरणात जलदगतीने खटला चालवण्याच्या दिशेनेही कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT












