मुलगी डान्स क्लास लावण्याचा आई-बाबांकडे धरत होती हट्ट, घरच्यांनी दिला नकार, तिनं हार्पिक प्यायलं अन्...

Nashik News : आई वडिलांनी मुलीला डान्स क्लासला न पाठवल्याने मुलीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. मुलीने रागाच्या भरात पुढचा मागचा कोणताही विचार न करता थेट हार्पिक प्यायलं आहे.

Nashik News

Nashik News

मुंबई तक

22 Jul 2025 (अपडेटेड: 23 Jul 2025, 01:44 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुलीने आई-वडिलांकडे डान्स क्लास लावण्याचा धरला हट्ट

point

मुलीने रागाच्या भरात उचललं टोकाचं पाऊल

Nashik News : नाशिकच्या सहरातील म्हसरूळ परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने आपल्या वडिलांकडे डान्स क्लासला पाठवण्याचा हट्टा धरला होता. त्यानंतर आई वडिलांनी मुलीला डान्स क्लासला न पाठवल्याने मुलीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. मुलीने रागाच्या भरात पुढचा मागचा कोणताही विचार न करता थेट हार्पिक प्यायलं आहे. ही आत्महत्या असल्याची माहिती आता समोर आली आहे. नुलीवर मुंबईतील के.ई.एम रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र, तिच्या उपचार करण्याच्या दरम्यान मुलगी मृत पावली. यामुळे नाशिक येथील म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : पुण्यातील कोंढव्यात तरुणीने डिलिव्हरी बॉयविरोधात खोटा बनाव रचला, अन् स्वत:च अडकली पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

संबंधित प्रकरणात मुंबई पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. 27 एप्रिल रोजी एका अल्पवयीन मुलीने डान्स क्लासमध्ये जाण्यासाठी हट्ट धरला होता. पण तिच्या आई-वडिलांनी डान्स क्लासमध्ये प्रवेश घेऊ न दिल्याने मुलीला संताप अनावर झाला होता. त्यातूनच तिनं उचललेलं टोकाचं पाऊल धक्कदायक आहे. 

मुलीने रागाच्याभरात हार्पिक प्यायलं 

मुलीने रागाच्याभरात हार्पिक प्यायल्यानंतर, तिला तात्काळपणे के.ई.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आली. मात्र, उपचार सुरु असतानाच मुलीचं निधन झालं. संबंधित प्रकरणात कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात मुलीच्या आई-वडिलांकडून जबाब नोंदवण्यात आला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी लहान मुलांच्या सहनशीलतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. हल्लीच्या मुलांमध्ये सहनशीलता नाही, त्यामुळे आपण काळजी घ्यायला हवी, असे पोलिसांनी आवाहन केलं आहे. 

हेही वाचा : पत्नीचा जडला मेहुण्यावर जीव, प्रियकराच्या मदतीने पतीला दिला विजेचा झटका, खरं कारण लपवण्यासाठी रचला कट

नाशिकमध्ये तरुणीची आत्महत्या 

दरम्यान, नाशिकमध्ये आत्महत्येची दुसरी घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीने सुसाईड नोटमध्ये नैराश्याला बळी पडल्याचं कारण सुसाईड नोटमध्ये लिहिलं आणि गळफास घेत आत्महत्या केली आहे. तिनं सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की, आई, तुला मला त्रास द्यायचा नाही. माझा शिक्षणाचा खूप खर्च आहे. तू कसलाही ताण घेऊ नकोस. तुझी माझ्यामुळे मोठी धावपळ होते, असं ससाईड नोटमध्ये लिहून तरुणीने आत्महत्या केली आहे. दरम्यान, आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव हे पूजा डांबरे असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

    follow whatsapp