बापरे! दीराच्या खोलीत नग्न अवस्थेत आढळला वहिनीचा मृतदेह..गँगरेप केल्याचा पतीचा आरोप, घडलं तरी काय?

Shocking Murder Case :  उत्तरप्रदेशच्या बागपतमध्ये एका आशा वर्करचा मृतदेह आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा मृतदेह नग्न अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Shocking Murder Case Viral

Shocking Murder Case Viral

मुंबई तक

• 04:10 PM • 21 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीवर गँगरेप केला, पतीचा खळबळजनक आरोप

point

मृतदेहाजवळ काय काय सापडलं?

point

बागपतमध्ये नेमकं घडलं तरी काय?

Shocking Murder Case :  उत्तरप्रदेशच्या बागपतमध्ये एका आशा वर्करचा मृतदेह आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा मृतदेह नग्न अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्या घरात महिलेचा नग्न अवस्थेत असलेला मृतदेह आढळला, ते घरं महिलेच्या दीराचं होतं. दरम्यान, पीडितेच्या कुटुंबियांनी गँगरेपचा आरोप लावला असून पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. 

हे वाचलं का?

बागपतमध्ये नेमकं घडलं तरी काय?

हे संपूर्ण प्रकरण बागपत जिल्ह्यातील बडौत कोतवाली पोलीत स्टेशनच्या हद्दीतील एका गावात घडलं. आशा वर्कर नेहमीप्रमाणे कामावर निघाली होती. रस्त्यात तिने घरातील सामान खरेदी केलं आणि सामान रिक्क्षातून घरी पाठवला. पीडितेनं पतीला फोन केला आणि म्हटलं की, ती भुपेंद्रकडून उधारीचे पैसै घेऊन येत आहे. ती लवकरच परतेल. पण त्यानंतरच तिचा फोन नंबर बंद झाला. रात्रभर पती आणि मुलगा टेन्शनमध्ये होते. तरीही महिला घरी परतली नाही. सकाळ होताच ते भुपेंद्रच्या घरी पोहोचले, तेवहा त्यांना महिलेचा नग्न मृतदेह रुममध्ये दिसला. 

हे ही वाचा >> Mumbai Train Blast Case : मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी उच्च न्यायालयाचा धक्कादायक निकाल, मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

पत्नीवर गँगरेप केला, पतीचा खळबळजनक आरोप

मृत महिलेच्या पतीचं म्हणणं आहे की, त्याच्या पत्नीचं गँगरेप केलं गेलं आणि नंतर तिची हत्या केली. महिलेचा मृतदेह घरात सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या घरी महिलेचा मृतदेह आढळला, ते घर त्या महिलेच्या दीराचं आहे.

मृतदेहाजवळ काय काय सापडलं?

रुममध्ये चारही बाजूला दारुच्या बाटल्या आणि अन्नपदार्थ पडले होते. पत्नीला भुपेंद्रने मारलं आहे, असा आरोप महिलेच्या पतीनं केलाय. दरम्यान, पोलिसांनी आरोपी भुपेंद्रला अटक केली आहे.

हे ही वाचा >> भयंकर! 20 रुपयांसाठी तरुणाने आपल्या आईवर कुऱ्हाडीने केला हल्ला, हादरवून टाकणारं कारण आलं समोर

पोलिसांनी काय म्हटलंय?

या संपूर्ण प्रकरणाबाबत एसएसपी नरेंद्र प्रताप सिंह यांनी म्हटलंय, भुपेंद्रची चौकशी केली गेली आहे. तपासात समोर आलं आहे की, भुपेंद्रचे पीडित महिलेशी संबंध होते. मृत महिलेची आर्थिक स्थिती कमकुवत होती. त्यामुळे आरोपी तिची मदत करायचा. घटनेच्या दिवशी मृत महिला आरोपीकडून 1 लाख रुपये घ्यायला गेली होती. यावरून त्यांच्यात वाद झाला आणि आरोपीने तिची हत्या केली. 

    follow whatsapp