Crime News : वैष्णवी हगवणे या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. वैष्णवी हगवणेची पुनरावृत्ती केवळ राज्यातच नाही,तर देशभरात दिसून येत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात महिला या हुंडाबळीला बळी पडल्यानं आत्महत्या करत आहेत. अशीच एक घटना आता उघडकीस आलेली आहे. महिलेच्या माहेरच्यांनी पतीला हुंड्यात बुलेट गाडी दिली होती, पण मुलाला बुलेट नको त्याला थारच हवी असल्याचं म्हणत त्याने आपल्या पत्नीला छळलं. ही घटना आहे उत्तर प्रदेशातील बागपत येथील आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती ही उत्तर प्रदेशात दिसून आली आहे. पीडित मृत महिलेचं नाव हे मनीषा (वय 26) असे आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Mumbai Train Blast Case : मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी उच्च न्यायालयाचा धक्कादायक निकाल, मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
प्रकरण काय?
दरम्यान, या प्रकरणात अत्याचारांना कंटाळून सुसाईट नोटही लिहिली होती. त्यात मृत्यूसाठी तिचा पती कुंदन, सासरा, सासू आणि दोन मेहुणे दीपक आणि विशाल यांना जबाबदार धरलेलं आहे. 26 नोव्हेंबर 2023 मध्ये मनीषाचा नोएडातील दादरी येथील कुंदन नावाच्या तरुणाशी विवाह झाला होता. मनीषाच्या वडिलांनी तिच्या लग्नात 15-20 लाख रुपये, जावयासाठी बुलेट, हुंडा म्हणून दिला होता. त्यानंतर मनीषाच्या सासरच्या मंडळींनी आणि पती कुंदनने तिला थार गाडीची मागणी केली होती. मनीषाने सांगितलं की, तिच्या वडिलांनी लग्नासाठी कर्ज घेतलं आणि ते एवढी रक्कम देऊ शकत नव्हते.
यानंतर, मनीषावर तिच्या सासरच्या लोकांनी छळ केला. तिला दररोज मारहाण केली जात होती, त्यानंतर बंद खोलीत ठेवले जात होते. तसेच तिला जेवणंही दिलं जात नव्हतं. मनीषाने स्वत: सांगितलं की, तिला विजेचा शॉक देऊन मारण्याचा प्रयत्नही केला होता.
तिच्या सासरच्या मंडळींना हुंड्याचा लोभ आणि त्यांचे टोमणे ती सहन करू शकली नाही. 15 जुलै रोजी तिने आत्महत्या केली, पण मरण्यापूर्वी मनीषाने तिच्या शरीरावर सुसाईड नोट लिहिली. माझा नवरा कुंदन मला धमकी देतो की जर माझ्या वागण्या-बोलण्याबद्दल काय सांगितलं तर तुला जिवंत मारून टाकेन.
तळहातावर लिहिली सुसाईड नोट
तिथे तिच्या हाताच्या तळहातावरण लिहिले की, माझ्या पतीने आणि माझ्या सासरच्यांनी मला बंद खोलीत ठेवले. त्यांनी मला जेवणंही दिलं नाही. त्यानंतर मनीषाने तिच्या पायावर लिहिलं की, माझ्या मृत्यूला दुसरे कोणीही जबाबदार नाही, तर माझा नवरा, कुंदन, सासू, सासरे आणि माझे दोन धाकटे मेहुणे दीपक आणि विशाल आहेत, असं तिनं लिहिलं होतं. तसेच तिच्या सासरच्यांनी तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
हेही वाचा : "जा मराठी बोलणार नाही हा हिंदुस्तान...", परप्रांतिय महिला दुकानदाराची मराठी ग्राहकांवर मुजोरी
संबंधित प्रकरणाची माहिती मृत महिला मनीषाच्या धाकट्या भावाने पोलिसांना दिली होती. त्यानंतर, पोलीस आता संबंधित प्रकरणाचा तपास करत आहेत. महिलेसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेण्यात आला, पण हुंड्यात घेतलेलं सामान पुन्हा परत करता येणार नसल्याचं पीडित तरुणीचा भाऊने तक्रारीत म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
