Crime News : एका ट्यूशन शिक्षकाची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत शिक्षक गावात खाजगी शिकवणी घेतो. 13 मार्च रोजी तो शिकवणीसाठी घराबाहेर पडला होता. मात्र वाटेतच त्याची हत्या करण्यात आली. मृत शिक्षकाचे नाव अबिद असे असून तो 44 वर्षांचा होता. ही हत्या इतक्या निर्दयीपणे करण्यात आली की सगळेच हादरुन गेले. गावातीलच मक्याच्या शेतात त्याचा मृतदेह सापडला. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'स्वाभिमान'मुळे देशभरातील 10 लाख महिलांचे भाग्य बदलेल - डॉ. प्रीती अदानी
मक्याच्या शेतात आढळला मृतदेह
शुक्रवारी सकाळी गावातील एका मक्याच्या शेतात आबिद यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. शेतमालक शरीफ हे सिंचनासाठी शेतात गेले असता त्यांना हा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ याची माहिती अबिदच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्या इतक्या निर्दयीपणे करण्यात आली होती की, मारेकऱ्यांनी आबिद यांच्या डोळ्यात आणि शरीराच्या इतर भागात अतिशय निर्दयीपणे भोसकला होता.
मारेकरी कोण?
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पूर्णिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवला आहे. आबिद यांच्या सासर्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे कोणाशीही वैर नव्हते त्यामुळे या हत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरून पुरावे गोळा करत असून हत्येचा हा कट कोणी आणि का रचला, याचा शोध पोलीस घेत आहेत.
हे ही वाचा : पालघरमध्ये पोलिसांच्या भीतीपोटी तरुण धावू लागले, मालगाडीने दिली धडक अन् तिघांचा करुण अंत
पोलिसांनी काय सांगितले?
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून पोस्ट मार्टम रिपोर्ट आणि तांत्रिक पुराव्यांनंतरच हत्येचे कारण स्पष्ट होईल. एका शांतताप्रिय शिक्षकाची अशा प्रकारे हत्या झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस लवकरच आरोपींना अटक करतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT











