हळूच यायचा अन् शेजारी राहणाऱ्या महिलेची अंतर्वस्त्रे चोरायचा, अटकेनंतर 25 वर्षीय तरुणाने सगळंच सांगितलं

Crime News : एका 25 वर्षीय तरुणाला शेजारी राहणाऱ्या विवाहित महिलेच्या घराबाहेरून तिची अंतर्वस्त्रे वारंवार चोरल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. चिमणगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती आणि आश्चर्याचे वातावरण आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 04:22 PM • 15 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

हळूच यायचा अन् शेजारी राहणाऱ्या महिलेची अंतर्वस्त्रे चोरायचा

point

अटकेनंतर 25 वर्षीय तरुणाने सगळंच सांगितलं

Crime News : मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये एक धक्कादायक आणि तितकीच विचित्र घटना समोर आली आहे. एका 25 वर्षीय तरुणाला शेजारी राहणाऱ्या विवाहित महिलेच्या घराबाहेरून तिची अंतर्वस्त्रे वारंवार चोरल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. चिमणगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती आणि आश्चर्याचे वातावरण आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबई : कॅमेरा असल्याचं माहिती नाही, महिलेने लिफ्टमध्ये तरुणाला किस केलं, व्हिडीओ थेट सोसायटीच्या ग्रुपवर पडला

अंतर्वस्त्रे चोरीला जात असल्याची तक्रार

धंचा भवन परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाने त्यांच्या घराबाहेर वाळत घातलेली महिलांची अंतर्वस्त्रे वारंवार चोरीला जात असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. रात्रीच्या वेळी कपडे गायब होत असल्याने संशय बळावल्याने कुटुंबाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक तरुण मध्यरात्री चोरपावलांनी येऊन केवळ विवाहितेची अंतर्वस्त्रे चोरून पळून जात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. हे पुरावे कुटुंबाने पोलिसांच्या स्वाधीन केले.

या कारणामुळे करायचा चोरी

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम राबवून अंकित मालवीय या 25 वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे, आरोपी अंकित हा तक्रारदार कुटुंबाचा शेजारीच राहणारा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 'तिच्यावर माझे एकतर्फी प्रेम होते,' असे सांगत त्याने आपल्या विकृत कृत्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलीसही चक्रावून गेले.

हे ही वाचा : 14 वर्षाच्या मुलीला लग्नाचे खोटे आमिष दाखवलं, नंतर रेल्वेत जबरदस्ती नेत केले लैंगिक अत्याचार, तरुण पळाला अन्...

छातीवर टॅटूही गोंदवला

तपासादरम्यान पोलिसांना आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली. या तरुणाने आपल्या छातीवर त्या विवाहित महिलेच्या नावाचा टॅटूही गोंदवून घेतला होता. संबंधित महिलेप्रती असलेल्या टोकाच्या वेडातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. सध्या पोलिसांनी आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली असून, निवासी भागातील नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित कळवावे, असे आवाहन केले आहे.

    follow whatsapp