मित्राचे बायकोशी प्रेमसंबंध, नवऱ्याने दोनदा नको 'त्या' अवस्थेत रंगेहाथ पकडले, तळपायाची आग मस्तकात गेल्याने केला खून

crime news : मित्राच्या बायकोशी तरुणाचे अवैध प्रेमसंबंध होते, नवऱ्याने मित्राला आणि त्याच्या बायकोला अनेकदा रंगेहाथ पकडले होते. त्याने अनेकदा बायकोला आणि संबंधित तरुणाला समाजवून सांगितले, पण त्या दोघांनी काहीही ऐकलं नाही. या प्रकरणात नवऱ्याने आपल्या बायकोच्या प्रियकरावर चाकूने हल्ला करत संपवलं.

Mumbai Tak

मुंबई तक

15 Mar 2026 (अपडेटेड: 15 Mar 2026, 07:48 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आरोपीचे महिलेशी विवाहबाह्य प्रेमसंबंध 

point

ड्रेनेजजवळ मक्याच्या शेतात चाकू आणि कुऱ्हाडीने हल्ला करत निर्घृण हत्या

Crime News : मित्राचे बायकोशी अवैध प्रेमसंबंध होते, नवऱ्याने मित्राला आणि त्याच्या बायकोला अनेकदा रंगेहाथ पकडले होते. त्याने अनेकदा बायकोला आणि संबंधित तरुणाला समाजवून सांगितले, पण त्या दोघांनी काहीही ऐकलं नाही. या प्रकरणात नवऱ्याने आपल्या बायकोच्या प्रियकरावर चाकूने हल्ला करत संपवलं. मृत व्यक्तीचे नाव रवी मोहन कुमार असे होते. तसेच आरोपीचे नाव विक्रम ऋषिदेव असे आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Assembly Election 2026: पाच राज्याच्या निवडणुकांची तारीख अखेर जाहीर, 'या' दिवशी कोणाचा होणार खेला होबे?

आरोपीचे महिलेशी विवाहबाह्य प्रेमसंबंध 

घडलेल्या घटनेनुसार, रवी मोहन कुमारचे मुख्य आरोपी विक्रम ऋषिदेवच्या पत्नीसोबत काही वर्षांपासून प्रेमसंबंध सुरु होते. दोघांना अनेकदा त्याने रंगेहाथ पकडले होते. सांगण्यात येतंय की, 26 फेब्रुवारी रोजी बहि‍णीच्या लग्नानंतर दोघांनाही आक्षेपार्ह स्थितीत बघितले होते. त्याचदरम्यान त्याने रवी मोहनच्या हत्येचा कट रचला. त्याने आपल्या बायकोला तिच्या माहेरी पाठवले, तो हत्येचीच संधी शोधत होता. 

एका मिरवणुकीदरम्यान फटाके फोडण्यावरून वाद झाला,त्यामध्ये रवी मोहनही सहभागी झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विक्रमने घटनेचा फायदा घेत, चुलत भाऊ सतीश कुमारसोबत मिळून सुनियोजित हत्येचा कट रचला होता. दोघांनी वापरलेली शस्त्रे घटनास्थळी लपवून ठेवली होती. 

ड्रेनेजजवळ मक्याच्या शेतात चाकू आणि कुऱ्हाडीने हल्ला करत निर्घृण हत्या

रात्री, विक्रम आणि सतीश यांनी रवी मोहनला भेटण्याच्या बाहण्याने बोलावले आणि मक्याच्या शेतात चाकू आणि कुऱ्हाडीने हल्ला करत निर्घृण हत्या केली. प्रतिकार करताना आरोपी विक्रमला किरकोळ दुखापत झाली. या हत्येनंतर, दोघांनीही ड्रेनेजजवळ शस्त्रे लपवली, तर मृताचा मोबाईल फोन मक्याच्या शेतातील झाडाखाली पुरला. 

रक्ताच्या डागामुळे पोलिसांना भलताच संशय

या घटनेला एक वेगळं वळण प्राप्त झालं, आरोपी हा गावात परतला आणि अफवा पसरवू लागला की, लग्नात काही गुन्हेगारांनी पीडितेवर हल्ला केला होता, गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच शुक्रवारी सकाळी पोलीस आणि पत्रकारांनी घटनेची चौकशी केली असता, कपड्यांवरील रक्ताच्या डागामुळे पोलिसांना भलताच संशय आला. 

हे ही वाचा : महाराष्ट्राची अवस्था बघून अस्वस्थ झालात? शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर रिलीज

दरम्यान, हत्येत वापरण्यात आलेले शस्त्र पोलिसांनी जप्त केले. नंतर दुपारी 3 वाजताच्या सुमारास, पोलिसांनी दोघांची चौकशी केली. चौकशीदरम्यान, आरोपी विक्रम कुमारने गुन्ह्याचा कबुलीनामा दिला, तसेच हत्येत वापरलेले शस्त्र आणि फोनबाबत माहिती दिली होती. या जप्तीमुळे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. 

    follow whatsapp