Crime News : एका महिलेला राज्यपाल बनवण्याचे आणि तिच्या मुलाला चित्रपटात मुख्य अभिनेत्याची (हिरो) भूमिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून 10 लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पीडित अनिता मिश्रा यांनी राजीवनगर पोलीस ठाण्यात युवराज प्रताप सिंह नावाच्या तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. आरोपीने स्वतःचे बड्या राजकारण्यांशी जवळचे संबंध असल्याचे भासवून पीडितेचा विश्वास संपादन केला. इतकेच नव्हे, तर सिमला येथे जमीन आणि दिल्लीत आलिशान घर मिळवून देण्याचेही प्रलोभन दिले. फसवणुकीचा कळस म्हणजे, "तुमची फाईल राष्ट्रपतींकडे पाठवली आहे, तुम्ही लवकरच राज्यपाल व्हाल," असे सांगून आरोपीने पीडितेकडून वेळोवेळी पैसे उकळले. सिमला येथे जमीन दाखवण्यासाठी नेल्यानंतर तिथल्या एका हॉटेलचे भाडे भरण्याच्या बहाण्यानेही त्याने 1 लाख रुपये लुबाडले. या संपूर्ण कटात त्याने अशोक आणि शाहनवाज नावाच्या व्यक्तींना फोन लावून मोठ्या नेत्यांशी बोलत असल्याचे नाटक केले होते, ज्याला बळी पडून एका सुशिक्षित कुटुंबाला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे फसवणुकीचा एक अत्यंत धक्कादायक आणि अजब प्रकार समोर आलाय.
ADVERTISEMENT
वीज बिल अपडेट आणि नोटा दुप्पट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांचा सुळसुळाट
दुसरीकडे, पाटणा आणि मुझफ्फरपूर परिसरात सायबर गुन्हेगार आणि ठगांनी धुमाकूळ घातला असून वेगवेगळ्या घटनांमध्ये लाखो रुपयांची लूट केली आहे. पाटणा येथे वीज मीटर अपडेट करण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी तीन जणांना 6.11 लाख रुपयांचा चुना लावला आहे. यामध्ये एसकेपुरी येथील एका रहिवाशाला लिंक पाठवून त्यांच्या खात्यातून 3.91 लाख रुपये लंपास करण्यात आले. तसेच, मुझफ्फरपूर रेल्वे स्थानकावर नोटा दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने एका प्रवाशाची 50 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुझफ्फरपूर स्थानकावर दोन भावांनी एका प्रवाशाला गाठले आणि पैसे दुप्पट करण्याच्या योजनेचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 50 हजार रुपये घेतले. त्या बदल्यात प्रवाशाला कागद आणि रुमालात गुंडाळलेले एक बंडल देऊन ते पसार झाले, ज्यावर केवळ एक पाचशेची नोट लावलेली होती. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. एकूणच, सध्या चोरट्यांनी फसवणुकीचे नवनवीन मार्ग शोधले असून कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक न करण्याचे आणि अनोळखी व्यक्तींच्या प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra Weather : राज्यातील 'या' विभागात अवकाळी पावसाचं संकट घोंगावणार, हवामानाचा अलर्ट जारी
ADVERTISEMENT











