भयंकर! 20 रुपयांसाठी तरुणाने आपल्या आईवर कुऱ्हाडीने केला हल्ला, हादरवून टाकणारं कारण आलं समोर

Crime news : आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने आपल्याच आईचा 20 रुपयांसाठी खून केला आहे.

Crime news

Crime news

मुंबई तक

• 01:59 PM • 21 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

आई-मुलाच्या नात्याला काळीमा

point

लेकानेच आईला संपवलं

Crime news : आई आणि मुलाचं नातं हे या भूतलावरील सर्वात सुंदर नातं आहे. या नात्यात कोणतीही तडतोड केली जात नाही. आपल्या सर्व चुका आपली आई पोटात घेत असते. पण हल्लीच्या पिढीला आई, वडील, भाऊ बहीन यांची कदर राहिली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहेत. हरियाणातील नूह येथे आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने आपल्याच आईचा 20 रुपयांसाठी खून केला आहे. आरोपीच्या धाकट्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित आईला मृतदेह हा शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : Mumbai Train Blast Case : मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी उच्च न्यायालयाचा धक्कादायक निकाल, मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

लेकाने आईच्या मानेवर कुऱ्हाडीने केला घाव

जयसिंगपुरातील रहिवासी असणाऱ्या रिजोलने संबंधित प्रकरणाबाबत सांगितलं की, त्याचा भाऊ जमशेद 19 जुलै रोजी रात्री राहत्या घरीच होता. त्याने आपल्या आईकडे ड्रग़्साठी 20 रुपये मागितले. त्यानंतर त्याच्या आईने पैसे देईल असं सांगितलं. त्यानंतर त्याने रागाच्या भरात आईच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालत हल्ला केला. या हल्ल्यात आईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला. दरम्यान, हल्लेखोराचा विवाह झाला आहे, पण त्याची पत्नी त्याच्या घरी राहत नसल्याची माहिती समोर आली. 

धक्कादायक कारण आलं समोर

ड्रग्सच्या व्यसनामुळे आईने आपल्या मुलाला आपल्याकडेच ठेवले होते. गेली पाच वर्षांपासून माय लेक राहत होते. संबंधित प्रकरणात रिजोलने सांगितलं की, त्याच्या वडिलांचे 4 महिन्यापूर्वी निधन झालं होतं. तो आणि त्याची आई जयसिंगपूरा येथे राहतात. तो मुळचा चिरांग जिल्ह्यातील आहे. त्याचे वडील सुमारे 30 वर्षांपूर्वी हरियाणा येथे आले होते, त्यांच्या स्क्रॅपचा व्यवसाय होता. 

हेही वाचा : वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती, बुलेट नको मला थारच पाहिजे,पीडितेनं अंगावरच लिहिली सुसाईड नोट

आईच्या झालेल्या या हत्येनं कुटुंब आणि नातेवाईक शोकाकुल होते, रिझोलनं म्हटलं की, जो आपल्या आईचा होऊ शकत नाही तो कोणाचाही होऊ शत नाही. रिझुल म्हणाला ती, जमशेदने त्याच्या पहिल्या पत्नीला दारूच्या नशेत घराबाहेर काढण्यात आले आणि त्याने त्याच्या आईची हत्या केली, असा माणूस कोणाचाही होऊ शकत नाही. 

    follow whatsapp