विकृतीचं टोक! व्हॅन ड्रायव्हरने चार वर्षांच्या मुलीलाही सोडलं नाही, बसमध्येच केलं लैंगिक शोषण, गुप्तांगाला झाल्या वेदना

Crime News : एका शाळेच्या व्हॅन चालकाने एका चार वर्षाच्या चिमुरडीलाही सोडलं नाही. नराधमाने खेळण्या बागडणाऱ्या चिमुरडीवर गाडीतच लैंगिक शोषण केलं आहे.

crime news van driver sexually abused four-year-old girl

crime news van driver sexually abused four-year-old girl

मुंबई तक

• 01:28 PM • 20 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

शाळेच्या व्हॅन चालकाने चार वर्षांच्या मुलीवर केले लैंगिक शोषण

point

गुप्तांगाला वेदना झाल्याचं आईला सांगितलं

Crime News : उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एका शाळेच्या व्हॅन चालकाने एका चार वर्षाच्या चिमुरडीलाही सोडलं नाही. नराधमाने खेळण्या बागडणाऱ्या चिमुरडीवर गाडीतच लैंगिक शोषण केलं आहे. त्याने तिला मारहाणही केली. मुलीने सर्व घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर पीडित चिमुरडीच्या आईनं नराधमाविरोधात शाळेत तक्रार केली. 

हे वाचलं का?

हेही वाचा : महापालिका निवडणूक, ठाकरे बंधु एकत्र, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव...उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या दुसऱ्या भागात सगळंच सांगितलं

अमर उजाला या वृत्तमाध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, पीडितेच्या आईने सांगितलं की, बसचालक मोहम्मद आरिफने तिला धमकी दिली. तसेच, शाळेच्या व्यवस्थापकाने तक्रारीवर कोणतीही कारवाई केलेली नाही. अशा स्थितीत, गुरूवारी, पीडित लहान मुलीच्या आईने इंदिरानगर पोलीस, ठाण्यात नराधम आरिफ आणि शाळेचे व्यवस्थापक संदीप कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. अशा स्थितीत पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केलेली आहे. 

पीडितेनं घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला 

पीडितेनं आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. पीडितेनं आपलं गुप्तांग दुखत असल्याचं आईला सांगितलं. ते ऐकून आईला धक्काच बसला. घरी येऊन तिने आपल्या मुलीला गोडीगुलाबीनं विचारले असता, त्या चिमुरडीनं घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे. व्हॅन चालवणाऱ्या काकाने चुकीच्या पद्धतीचे हातवारे केल्याचं तिनं सांगितलं. म्हणून ती तक्रार करण्यासाठी ताबडतोब शाळेत पोहोचली. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. 

हेही वाचा : वारंवार शारीरिक संबंध अन् नंतर गोळ्या देऊन... लग्नाचं आमिष दाखवून नवी मुंबईतील तरुणीवर अत्याचार!

संबंधित अहवालांनुसार, गुरुवारी महिलेनं इंदिरानगराच्या पोलीस ठाण्यातील व्हॅनमध्ये चालकाच्या विरोधात अत्याचार प्रतिबंधक कायदा गुन्हा दाखल केला. बलात्कार पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी अटकही केल्याची माहिती समोर आली आहे. एसपी गाझीपूर ए विक्रम सिंह यांनी संबंधित प्रकरणाचा तपास केला आहे. 

या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी पीडितेच्या लैंगिक शोषणानंतर ड्रायव्हरने मुलीला खूपदा धमकावले. त्यामुळे ती लहान पीडित मुलगी भयभीत झाली होती. 

    follow whatsapp