Extramarital affair : पत्नीने बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याच्या जेवणात मिसळलं विष, लग्न करावं की नाही? तरुणांमध्ये भितीचं वातावरण

Extramarital affair : पत्नीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहायचे होते, म्हणूनच तिनं आपल्या पतीला विष पाजून त्याची हत्या केली. मृत व्यक्तीचे नाव रसूल (वय 35) आहे. आरोपी महिलेचं नाव अम्मुबी असे आहे.

Extramarital affair

Extramarital affair

मुंबई तक

21 Jul 2025 (अपडेटेड: 21 Jul 2025, 09:43 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सांबरमध्ये विष टाकून पत्नीनं पतीला मारलं

point

नेमकं कय घडलं?

Extramarital affair : राज्यातील तामिळनाडू येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या पत्नीनेच आपल्या पतीला विष पाजून त्याची हत्या करण्यात आली आहे. पत्नीनं केलेल्या या अशा हैवानी कृत्याचे कारण समोर आलं आहे. महिलेनं तिच्या पतीची हत्या केली. महिला आणि तिचा बॉयफ्रेंड यांच्या अनैतिक नातेसंबंधात पती अडथळा बनत होता.

हे वाचलं का?

पत्नीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहायचे होते, म्हणूनच तिनं आपल्या पतीला विष पाजून त्याची हत्या केली. मृत व्यक्तीचे नाव रसूल (वय 35) आहे. आरोपी महिलेचं नाव अम्मुबी असे आहे. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराच्या मुसक्या आवळल्या आहेत. सध्या ते तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. 

हेही वाचा : भयंकर! 20 रुपयांसाठी तरुणाने आपल्या आईवर कुऱ्हाडीने केला हल्ला, हादरवून टाकणारं कारण आलं समोर

पतीच्या रक्तात सापडले किटकनाशके 

रसूल आणि पत्नी अम्मुबी यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे अपत्य होते. रसूल हा एका खासगी कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करायचा. मात्र, त्याची पत्नी अम्मुबीचं लोकेश्वरन नावाच्या एका परपुरूषासोबत अनैतिक संबंध सुरु होते. काही दिवसांपासून रसूलला उलट्या झाल्या होत्या आणि नंतर तो बेशुद्ध पडला होता. त्यानंतर कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्यास सुरूवात केली. त्याच्या रक्ताचे सॅम्पल तपासले असता, त्यात किटकनाशके आढळून आल्याची माहिती रसूलच्या कुटुंबाला समजली असता, त्यांना मोठा धक्का बसला.  

सांबरमध्ये विष टाकून पतीला मारलं

या घटनेनंतर संशयाच्या आधारे अम्मुबीकडे संबंधित प्रकरणाची चौकशी केली आहे. तिने काही विचित्र गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर त्यांनी तिच्या मोबाईलवरील व्हॅट्सअॅप चॅट तपासले. त्यानंतर संबंधित प्रकरणाची माहिती समोर आली. लोकेश्वरनच्या सांगण्यावरूनच अम्मुबीने रसूलला विष पाजले. तिने सुरूवातील डाळिंबाच्या ज्युसमध्ये विष मिसळले, त्यानंतर तो ज्युस रसूलला प्यायला दिला. पण रसूलने ज्युस पिण्यास नकार दिला. त्यानंतर पत्नीने जेवणाच्या सांबरात विष मिसळले आणि त्यानंतरच त्यांचा मृत्यू झाला. 

हेही वाचा : वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती, बुलेट नको मला थारच पाहिजे,पीडितेनं अंगावरच लिहिली सुसाईड नोट

संबंधित प्रकरणात अम्मूबी आणि तिच्या बॉयफ्रेंडविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी शनिवारी पुन्हा गुन्हा दाखल करून अम्मुबी आणि लोकेश्वरन यांना अटक केली आहे. 

    follow whatsapp