नालासोपारा: 20 वर्षांच्या बॉयफ्रेंडसोबत सतत हवे होते शारीरिक संबंध, पतीला घरातच पुरलं, वरून बसवली टाइल्स!

पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यात महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. पतीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह घरातच पुरण्यात आला.

प्रियकरासाठी महिलेने केली पतीची हत्या (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)

प्रियकरासाठी महिलेने केली पतीची हत्या (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)

मुंबई तक

22 Jul 2025 (अपडेटेड: 23 Jul 2025, 08:32 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अनैतिक संबंधामुळे प्रियकराच्या साथीने केली पतीची हत्या

point

हत्या केल्यानंतर मृतदेह घरातंच पुरला अन्...

point

नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

Crime News: प्रियकरासोबतच्या अनैतिक संबंधामध्ये पती आड येत असल्याकारणाने पत्नीने त्याची निर्घृणपणे हत्या केली. सध्या, अशा बातम्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यात महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचं असंच एक वृत्त समोर आलं आहे. पतीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह घरातच पुरण्यात आला. नापासोपारा पुर्वेकडील गंगडीपाडा परिसरात साई वेल्फेयर सोसायटीतील एका चाळीत ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

हे वाचलं का?

हत्या करून मृतदेह घरातच पुरला 

मृत व्यक्तीची ओळख विजय चौहान असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, आरोपी महिलेचं नाव गुडिया उर्फ चमन देवी (28) आणि तिच्या प्रियकराचं नाव मोनू (20) असल्याचं सांगितलं जात आहे. महिलेचं गेल्या बऱ्याच काळापासून तिच्या प्रियकरासोबत अनैतिक संबंध सुरू होते. दोघांच्या नात्यात पती आड येत होता. याच कारणामुळे पत्नीने आपल्या पतीचा काटा काढण्याचं ठरवलं. आरोपी महिलेने आपल्या प्रियकारासोबत मिळून पतीची निर्घृणपणे हत्या केली. कोणालाच या प्रकारामुळे कळू नये, म्हणून आरोपींनी मृतदेह घरातंच पुरला.

कुटुंबियांची दिशाभूल करत राहिली   

पतीचा मृतदेह लपवून ठेवण्यासाठी आरोपी महिलेने दिराच्या मदतीने त्या ठिकाणी टाइल्स म्हणजेच फरशी लावून घेतल्या. या घटनेनंतर कुटुंबातील बऱ्याच जणांनी विजयबद्दल तिच्या पत्नीला विचारलं, मात्र आरोपी महिला सतत कुटुंबियांची दिशाभूल करत राहिली. काही काळानंतर विजय घरात नसल्याचं पाहून त्याच्या एका भावाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. 

हे ही वाचा: बीड: रात्री लघुशंकेसाठी उठली अन् ओढून खोलीत नेलं, सख्ख्या मामानेच भाचीसोबत...

चॅट्सवरून झाला खुलासा 

यानंतर सोमवारी सकाळी पोलिसांची टीम घटनास्थळी पोहचली. त्यावेळी घरातंच दुर्गंधी जाणवत असल्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी घरातच पुरलेला मृतदेह बाहेर काढला. फॉरेन्सिक एक्सपर्ट्स आणि स्थानिक तहसीलदार यांच्या उपस्थितीत सगळी तपासणी करण्यात आली. तपास करत असताना पोलिसांना महिलेच्या मोबाईलमध्ये संशयास्पद मॅसेज आढळले आणि त्यावरून हे प्रकरण उघडकीस आलं. विजयची हत्या सुमारे 10 ते 15 दिवसांपूर्वी झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला. 

हे ही वाचा: सातारा हादरला! "..तर मी हिला ठारच करेन", एकतर्फी प्रेम प्रकरणातून तरुणाने शाळकरी विद्यार्थीनीच्या गळ्याला लावला चाकू

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असल्याची पोलिसांनी माहिती दिली. दोन्ही आरोपींचा तपास सुरू असून विजय आणि गुडियाला एक 8 वर्षांचा मुलगा असल्याची देखील माहिती समोर आली आहे. 


 

    follow whatsapp