सातारा हादरला! "..तर मी हिला ठारच करेन", एकतर्फी प्रेम प्रकरणातून तरुणाने शाळकरी विद्यार्थीनीच्या गळ्याला लावला चाकू
Satara Crime : पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रातील साताऱ्यात धक्कादायक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमसंबंधातून तरुणाने मुलीच्या गळ्याला चाकू लावत मारण्याची धमकी दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रातील साताऱ्यात धक्कादायक घटना

एकतर्फी प्रेमसंबंधातून तरुणाने मुलीच्या गळ्याला लावला चाकू
Satara Crime : पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रातील ऐतिसिक वारसा असणाऱ्या साताऱ्यात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरूणाने विद्यार्थीनीच्या गळ्यावर चाकू लावत धमकावले. संबंधित विद्यार्थीनी ही शाळेच्या गणवेशावरच होती, तिचा व्हिडिओ आता सर्वत्र प्रचंड व्हायरल होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी तरुणाला फिल्मीस्टाईलने पकडले आहे. त्यानंतर त्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक शाळकरी विद्यार्थीनी घरी चालली असताना सातारा शहरातील बसप्पा पेठ येथे ही घटना घडली आहे.
हेही वाचा : शनि - बुध वक्री: 'या' राशीतील लोकांच्या आयुष्यात होणार मोठा बदल, आर्थिक चणचण लवकर दूर होणार, काय सांगतं ज्योतिषशास्त्र?
व्हिडिओत नेमकं काय?
व्हिडिओत पाहिल्यानंतर दिसते की, तरुणाच्या हातामध्ये एक चाकू आहे. पण तो धमकी देताना दिसत आहे. त्यावेळी तो एका रस्त्याच्या कडेला विद्यार्थीनीच्या गळ्याला चाकू लावताना दिसत आहे. त्याच ठिकाणी काही लोक विद्यार्थीनीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता, युवकाने चाकू बाजूला न ठेवता धमकी देण्यास सुरुवात केली.
नेमकं तरुण काय म्हणाला?
तरुण हातात चाकू घेताना दिसत असून तो म्हणतो की, "कोणी जवळ आलं तर हिलाच ठार करेन", असे तो ओरडत होता. काही महिलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच एका भिंतीवरून एकजण आला आणि त्याने धाडस दाखवून तरुणाच्या हातातील चाकू घेतला आणि विद्यार्थीनीला नराधमाच्या तावडीतून बाहेर काढलं. तेव्हा जमलेल्या जमावाने तरुणाला बेदम मारहाण केली.
हेही वाचा : Personal Finance: Google Pay आणि UPI वर वापरता येतं क्रेडिट कार्ड, फायदाही बराच!
त्यानंतर विद्यार्थीनीला सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले. चाकू धारदार असल्याने तिच्या गळ्याला चाकूचा स्पर्श झाल्याने तरुणीच्या गळ्याला किंचितशी जखम झाल्याची माहिती एका प्रसारमाध्यमाने दिली. त्यानंतर नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि विद्यार्थीनीला एका सरकारी रुग्णालयात पाठवले. हे सर्व तरुणीच्याच एकतर्फी प्रेमसंबंधातून घडलं असल्याची माहिती उघडकीस आली आहे.