बीड: रात्री लघुशंकेसाठी उठली अन् ओढून खोलीत नेलं, सख्ख्या मामानेच भाचीसोबत...

मुंबई तक

बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथे एका अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्ख्या मामानेच बलात्कार केल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

बीडमध्ये सख्ख्या मामानेच भाचीवर केला अत्याचार
बीडमध्ये सख्ख्या मामानेच भाचीवर केला अत्याचार
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रात्री लघुशंकेसाठी उठली असताना खोलीत नेऊन अत्याचार

point

सख्ख्या मामानेच भाचीसोबत केलं घाणेरडं कृत्य

point

बीडमधील संतापजनक घटना

Beed Crime: नातेसंबंधाचा तीळमात्र विचार मनात न आणता अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या बऱ्याच संतापजनक घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं. बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथे अशीच एक घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्ख्या मामानेच बलात्कार केल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे. 

लघुशंकेसाठी उठली असताना खोलीत नेऊन...

11 जुलै रोजी सिरसाळ्यात ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळाली. आरोपी व्यक्तीचं नाव सदरीया आयुब पठाण असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता आणि तिचा मामा एकत्र म्हणजेच एकाच वाड्यात राहत होते. रात्री 1 वाजता पीडिता झोपेतून लघुशंकेसाठी उठली होती. आपली भाची झोपेतून उठल्याचं पाहून तिचा मामा सुद्धा बाहेर आला आणि त्यावेळी त्याने पीडितेला बोलावले. त्यानंतर मुलगी दरवाज्याजवळ उभी असताना आरोपीने तिला बळजबरीने आत ओढलं आणि तिला खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

हे ही वाचा:  मोठी बातमी: जगदीप धनखड यांनी अचानक दिला उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा, राजधानी दिल्लीत मोठ्या उलथापालथी?

फोनवर आईला सांगितला सगळा प्रकार

मामाने आपल्यासोबत केलेल्या घाणेरड्या प्रकारामुळे पीडिता प्रचंड घाबरली आणि बदनामीच्या भितीने खोटं कारण सांगून ती घरातून निघून गेली. त्यावेळी पीडित मुलगी अंबाजोगाईला एका कार्यक्रमासाठी जाते, असं सांगून परभणीला गेली. पीडितेच्या आईला मुलीची खूप काळजी वाटू लागली आणि तिने विचारपूस करण्यासाठी आपल्या मुलीला फोन केला. फोनवर मुलीला आईने "बाळा, कशी आहेस?" असं विचारल्यानंतर पीडितेला हुंदका आवरला नाही आणि तिने आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला. 

हे ही वाचा: 'सभागृहात रमी खेळणं हे काही...', CM फडणवीसांचं 'हे' विधान माणिकराव कोकाटेंसाठी धोक्याचा इशारा?

आरोपीला अटक 

आईला या सगळ्याबद्दल कळताच तिने पोलिसात तक्रार करण्याचं ठरवलं. 20 जुलै रोजी पीडितेच्या आईने सिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीवरून, पोलिसांनी आरोपी मामा सदरीया आयुब पठाणला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात पोक्सो आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp