मोठी बातमी: जगदीप धनखड यांनी अचानक दिला उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा, राजधानी दिल्लीत मोठ्या उलथापालथी?

मुंबई तक

देशाचे उपराष्ट्रपती असलेल्या जगदीप धनखड यांनी आज (21 जुलै) अचानक त्यांच्या पदाचा राजीनामा भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

ADVERTISEMENT

जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा (फाइल फोटो)
जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा (फाइल फोटो)
social share
google news

नवी दिल्ली: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तात्काळ प्रभावाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात, त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव आणि वैद्यकीय सल्ल्याचा हवाला देत संविधानाच्या कलम 67(A) अंतर्गत राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रपती मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात, जगदीप धनखड यांनी लिहिले आहे की, 'आरोग्याला प्राधान्य देऊन आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करून, मी तात्काळ प्रभावाने भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे.' पावसाळी अधिवेशनाला अवघा एक दिवस शिल्लक असताना उपराष्ट्रपतींनी ज्या पद्धतीने तडकाफडकी राजीनामा दिला आहे ते पाहता राजधानी दिल्लीत सारं काही आलबेल नसल्याची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, राजीनामा देताना धनखड यांनी राष्ट्रपतींचे सहकार्य आणि सौहार्दपूर्ण संबंधांबद्दल आभार मानले. तसेच पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचे सहकार्य आणि मार्गदर्शनाबद्दल त्यांनी आभार मानले.

हे ही वाचा>> 'सभागृहात रमी खेळणं हे काही...', CM फडणवीसांचं 'हे' विधान माणिकराव कोकाटेंसाठी धोक्याचा इशारा?

जगदीप धनखड यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिले आहे की, 'संसदेतील सर्व सन्माननीय सदस्यांकडून मला मिळालेला स्नेह, विश्वास आणि आदर माझ्या हृदयात आयुष्यभर राहील.' उपराष्ट्रपती म्हणून त्यांच्या कारकिर्दीची आठवण करून देताना ते म्हणाले, 'या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला मिळालेल्या अनुभवांबद्दल आणि दृष्टिकोनांबद्दल मी मनापासून आभारी आहे. भारताच्या आर्थिक विकासाचे आणि अभूतपूर्व परिवर्तनाच्या टप्प्याचे साक्षीदार होणे माझ्यासाठी भाग्याची आणि समाधानाची गोष्ट आहे.' भारताच्या जागतिक उदय आणि उज्ज्वल भविष्यावर अढळ विश्वास व्यक्त करून त्यांनी राजीनामा दिला.

धनखड हे तिसरे उपराष्ट्रपती आहेत जे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत

जगदीप धनखड यांच्यापूर्वी, आणखी दोन उपराष्ट्रपती होते जे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. कृष्णकांत यांनी 21 ऑगस्ट 1997 रोजी उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. परंतु 27 जुलै 2002 रोजी त्यांच्या कार्यकाळात त्यांचे निधन झाले. यामुळे ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. याशिवाय, वराहगिरी वेंकट गिरी (व्ही.व्ही. गिरी) यांनीही 1969 मध्ये उपराष्ट्रपती म्हणून त्यांच्या कार्यकाळात राजीनामा दिला होता, जेणेकरून ते राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू शकतील.

हे वाचलं का?

    follow whatsapp