Crime News: दिल्लीत एक विवाहबाह्य संबंधाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीलाच संपवलं आहे. महिलेचा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणीही नसून तिचा दीर असल्याची माहिती समोर आली आहे. हा खून नसून पतीचा अपघात झाल्याचा कट महिलेनं आणि तिच्या बॉयफ्रेंडनं रचला. परंतु सोशल मीडियावर महिलेचे आणि तिच्या बॉयफ्रेंडचे चॅट्स समोर आल्याने संबंधित घटना उघडकीस आली आहे. महिलेचं नाव सुष्मिता असे आहे, तर तिचा बॉयफ्रेंड राहुल या दोघांनी मिळून हे भयंकर कृत्य केलं आहे. खून करण्यात आलेल्या निष्पाप पतीचं नाव करण असे आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : घोर कलियुग! पती मुंबईत पैसे कमवायला गेला, 40 वर्षीय महिला लेकरांना सोडून तरुणासोबत...पतीला कळताच....
नेमकं प्रकरण काय?
दिल्लीतील एका रुग्णालयात करणचा मृतदेह होता. तेव्हा त्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली, त्यावेळी करणची पत्नी सुष्मिता धाय मोकलून रडत रडत पतीला विजेचा झटका लागल्याचं कारण सांगितलं आणि नंतर तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला तात्काळपणे रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. तेव्हा शवविच्छेदन करण्यासाठी सुष्मिता आणि तिच्यासोबत असलेला तरुण राहुल नेहमी नकार देत होता. त्यानंतर पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली.
चॅट्समुळे प्रकरण आलं समोर
संबंधित प्रकरणाचे धक्कादायक खुलासे समोर आल्यानंतर, करणचा भाऊ कुणालला सुष्मिता आणि तिचा बॉयफ्रेंड राहुलला या प्रकरणाची पूर्वीपासूनच माहिती होती. राहुलच्या मनात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय निर्माण झाला होता. त्यानंतर त्याने आपला मृत भाऊ कुणालचा मोबाईल तपासण्यास सुरुवात केली. इंस्टाग्रामच्या चॅट्सद्वारे संपूर्ण कट उघडकीस आला. या चॅट्समधून करणच्या हत्येबाबतची चॅटिंग समोर आली. तेव्हाच या घटनेचा खुलासा उघडकीस झाला आहे. कुणालनेच ताबडतोब पोलिसांना याची माहिती दिली.
गुन्ह्याचा कबुलीनामा
संशय बळावल्यानंतर कुटुंबाने सुष्मिताची कसून चौकशी केली तेव्हा तिने व्हिडिओत तिच्या गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. सुष्मिताने सांगितलं की, तिने प्रथम करणला दह्यामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या. जेव्हा तो बेशुद्ध पडला. त्यानंतर राहुलने विजेच्या तारेनं त्याला शॉक दिला. यामुळे विजेचा झटका बसल्याचे भासवले आणि त्याला ठार करण्यात आले होते.
पतीची केलेली हत्या हा अपघात असल्याचा बनाव रचण्यात आला असं सांगितलं जातंय. सुष्मिता आणि राहुल हे डॉक्टरांना तसेच कर्मचाऱ्यांना वारंवार पोस्टमॉर्टम करण्यास नकार देत होते.. कुटुंबाला खात्री होती की, करणचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता तर नियोजित कट रचून हत्या करण्यात आली होती.
पोलिसांनी व्हिडिओ पाहिला आणि कुटुंबासोबतच्या एकूण चर्चा केल्यानंतर संपूर्ण प्रकरण स्पष्ट झाले. याचदरम्यान, सुष्मिता आणि राहुलला अटक करण्यात आलेली आहे. हत्येच्या कलमांन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन केल्यानंतर त्या रिपोर्टमध्ये असेही स्पष्ट झालं की, करणचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला होता, परंतु त्याच्या शरीरावर काही खुणा आढळलेल्या दिसत आहेत.
हेही वाचा : शनि - बुध वक्री: 'या' राशीतील लोकांच्या आयुष्यात होणार मोठा बदल, आर्थिक चणचण लवकर दूर होणार, काय सांगतं ज्योतिषशास्त्र?
करणच्या भाऊ कुणालने पोलिसांना सांगितलं की, राहुलचे वडील त्यांना सतत धमक्या देत होते. जर केस मागे घेतली नाही,तर वाईट परिणाम भोगावे लागेल, असं तो म्हणाला. कुटुंबाने पोलिसांकडून संरक्षणाची आणि दोषींना कठोर शिक्षेची मागणी केली.
ADVERTISEMENT
