घोर कलियुग! पती मुंबईत पैसे कमवायला गेला, 40 वर्षीय महिला लेकरांना सोडून तरुणासोबत...पतीला कळताच....

मुंबई तक

Crime News : एका चार अपत्यांची आई असलेल्या महिलेनं तिच्या पतीला सोडून दिलं. त्यानंतर तिच्यापेक्षा पंधरा वर्षे लहान वयाच्या प्रियकराला आपलं जोडीदार बनवलं आणि ती त्या तरुणासोबत पळून गेली.

ADVERTISEMENT

extramarital affairs
extramarital affairs
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चार अपत्यांची आई असलेली महिला पतीला गेली सोडून

point

पंधरा वर्षे लहान तरुणासोबत केलं कॉर्ट मॅरेज

Crime News : उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे. एका चार अपत्यांची आई असलेल्या महिलेनं तिच्या पतीला सोडून दिलं. त्यानंतर तिच्यापेक्षा पंधरा वर्षे लहान वयाच्या प्रियकराला आपलं जोडीदार बनवलं आणि ती त्या तरुणासोबत पळून गेली. महिलेचं वय वर्षे 40 आहे. तर महिलेचा बॉयफ्रेंड 24 वर्षांचा असल्याची माहिती समोर आली आहे. 

हेही वाचा : सातारा हादरला! "..तर मी हिला ठारच करेन", एकतर्फी प्रेम प्रकरणातून तरुणाने शाळकरी विद्यार्थीनीच्या गळ्याला लावला चाकू

पतीनं पत्नीच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यास दिली परवानगी 

संबंधित महिलेला तिच्या पतीने मोकळीक सोडली आणि तिला तिचा स्वतंत्र विचार करण्यास सांगितला. त्याने तिला थांबवले नाही, कारण पत्नी आपलाच एक दिवस जीव घेईल या भितीने तो तिला काहीही बोलला नाही. महिलेनं सांगितलं की, ती एका तरुणासोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंधत आहे. तिला त्याच्यासोबतच आपलं आयुष्या घालवायचं आहे. महिलेनं पुढं असंही म्हटलं होतं की, तिला तिच्या चार मुलांची कसलीही आठवण येत नाही. 

नेमकं काय घडलं? 

महिलेचं आणि तिच्या पतीचं गेल्या वीस वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना चार अपत्य झाली. कुटुंबाचा खर्च वाढल्यानं रामचरण हा मुंबई येथे आला आणि घरांना टाईल्स बसवण्याचे काम करू लागला. घडलेल्या घटनेनुसार, गावात राहणाऱ्या एका पंधरा वर्षे लहान तरुणासोबत रामचरच्या पत्नीची ओळख झाली. त्याचं नाव परशुराम असे होते. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर कधी नात्यात झालं हे कळलंच नाही. मुंबईत काम, धंद्यासाठी गेलेल्या पतीला हे समजताच तो ताबडतोब गावात आला. त्यानंतर पतीने पत्नीला रोखण्याचा अनेकदा प्रयत्न केला त्यानंतर त्यांच्या कुटुंबात कलह होण्यास सुरूवात झाली.  

असे सांगितलं जातं की, एक वर्षांपूर्वी ती महिला अचानकपणे तिच्या प्रियकरासोबत निघून गेली होती. पण काहीच महिन्यानंतर ती परत आली. तिनं तिच्या पतीची माफी मागितली होती, त्यानंतर पतीने तिला पुन्हा त्याच्या आयुष्यावर प्रवेश दिला आणि तिला घरात प्रवेश देण्यात आला. 

आता पुन्हा एकता ती महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. तिने तिच्या चार मुलांचा कोणताही पुढंचा मागचा विचार केला नाही. या घटनेदरम्यान पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोन्ही पक्षांकडे तडजोड केली. पतीने आपल्या महिलेला तिच्या बॉयफ्रेंडसोबत जाण्याची परवानगी दिली संबंधित करारानुसार, चारही मुले पतीसोबत राहतील. यावेळी महिलेनं असेही स्पष्ट केलं की, ती गेल्या 4 वर्षांपासून तिच्या प्रियकराच्या संपर्कात आहे आणि आता ती आयुष्यभर त्याच्यासोबतच राहणार असल्याचा तिनं निर्णय घेतला होता. तिनं असंही म्हटलं की तिला तिच्या चारही मुलांची आठवण येत नाही. 

हेही वाचा : बीड: रात्री लघुशंकेसाठी उठली अन् ओढून खोलीत नेलं, सख्ख्या मामानेच भाचीसोबत...

दरम्यान, तरुणाने आणि महिलेनं कोर्ट मॅरेज देखील केलं आहे. महिलेच्या पतीने संबंधित प्रकरणात कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. कोणताही आक्षेप घेतलेला नाही. आता महिला ही तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहत आहे. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp